
सात हजारांची लाच भोवली; धुळे महापालिकेतील लाचखोर मुकरदम एसीबीच्या जाळ्यात….


सफाई कर्मचारीच्या हजेरी मधील नियमितता दाखवण्यासाठी मागितली होती लाच…
धुळे महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्याची हजेरी लावून पगार नियमित काढण्यासाठी तडजोडी अंती सात हजारांची लाच स्वीकारताना धुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील मुकरदमाला धुळे एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. रवींद्र शामराव धुमाळ (50, रा.भटाई माता रिक्षा स्टॉप, मोहाडी उपनगर, ता.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या कारवाईने धुळे मनपात आज लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे…
तक्रारदार हे धुळे महापालिकेतील आरोग्य विभागात प्रभाग क्रमांक 14 मध्ये सफाई कर्मचारी आहेत. सफाई कर्मचाऱ्यांवर देखरेख करण्यासाठी मुकरदम म्हणून संशयित आरोपी रवींद्र धुमाळ यांची नियुक्ती केलेली आहे. दैनंदीन हजेरी स्वच्छता निरीक्षका कडे पाठवण्याचे काम मुकरदमाकडे असून त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना दरमहा पगार अदा केला जातो. तक्रारदाराचा ऑगस्टचा पगार अदा झाल्यानंतर ते ड्युटीवर असताना पगार काढल्याच्या मोबदल्यात आठ हजार द्यावे लागतील व त्यानंतरच पुढच्या महिन्याचा पगार निघेल, असे मुकरदम रवींद्र धुमाळ यांनी बजावत लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. एसीबीने ह्या प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर संशयित आरोपीला सात हजारांची लाच घेताच रांगेहात पकडण्यात आले…
प्रतिनिधी: नागिंद मोरे



