
शिरपूर: कॉलेज विद्यार्थ्याची आत्महत्या, गळफास घेऊन जीवन संपवले


धुळे, शिरपूर: शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ असलेल्या एस.व्ही.के.एम. च्या निम्स (NIMS) कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अथर्व राजपुरोहित (रा. खरगोन, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
अथर्व राजपुरोहित हा निम्स कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. त्याने कॉलेज परिसरातील एका वसतिगृहात गळफास घेतला. ही घटना रात्री उशिरा घडल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे कॉलेज परिसरात खळबळ उडाली आहे. अथर्वच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली असून, त्याचे पालक शिरपूर येथे दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
प्रतिनिधी नागिंद मोरे



