
Dhule News धुळेतील दहावीचा विद्यार्थी जयकुमार अखेर सापडला!पश्चिम देवपूर पोलिसांच्या अथक परिश्रमांना यश…


धुळे (देवपूर) येथील चावरा शाळेचा दहावीचा विद्यार्थी जयकुमार उर्फ साई उज्ज्वल जाधव (वय १५) हा १० सप्टेंबर रोजी शाळेला जाताना बेपत्ता झाला होता. सहा दिवस शोध घेतल्यानंतर अखेर पश्चिम देवपूर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून जयकुमारला मध्यप्रदेशातील पिथमपूर येथे सुखरूप सापडला आहे.
जयकुमार शाळेत जात असताना अचानक गायब झाला होता. महामार्गावरील अनेक ढाबे, मंदिरे, हॉटेल्स – पोलिसांनी पालथे घातले होते. सुमारे ५० ते १०० ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. यात सोनगीर, शिरपूर, सेंधवा, पळासनेर, उज्जैन येथील टोलनाक्यांचेही सीसीटीव्ही फुटेज बघण्यात आले. यासह उज्जैन येथील महाकालच्या मंदिराचेही सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, तोवर मंदिरातून दर्शन घेवून साई पुन्हा पसार झाला – होता. तरीही पोलिसांनी हार न मानता साईचा शोध सुरुच ठेवला होता.
जयकुमार सायकलवरून धुळे सोडून थेट उज्जैनच्या दिशेने गेला होता. महाकाल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तो पुढे पायी निघाला. मोबाईल नसल्याने संपर्क होत नव्हता. शेवटी पिथमपूर येथे एका ट्रक चालकाच्या मदतीने त्याने मामाशी संपर्क साधला.
पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून जयकुमारला ताब्यात घेतले व सुखरूप घरी आणले. या संपूर्ण मोहिमेत पश्चिम देवपूर पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता व चिकाटी कौतुकास्पद ठरली.
#dhulenews #dhule #dhulecrime #dhulenews24 #news #viral #viralnews #trending #breakingmarathi



