
धुळे डी मार्ट येथून घेतलेल्या बिस्किट मध्ये आढळल्या आळ्या, ग्राहकाची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार


धुळे शहरातील डी मार्ट येथून एका ग्राहकाने गुड डे बिस्किट खरेदी केल्यानंतर ते घरी घेऊन आल्यावर अनिकेत बिरारी यांच्या मुलीने आणि त्यांच्या पत्नीने ते बिस्किट खाल्ल्यानंतर त्या बिस्कीट मध्ये बुरशी लागलेली असून मोठ्या प्रमाणात आळ्या आढळून आल्या..
यासंदर्भात संबंधित ग्राहक असलेल्या अनिकेत बिरारी यांनी धुळे येथील अन्न औषध प्रशासन गाठत डी मार्ट संदर्भात तक्रार केली… तसेच धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील लेखी तक्रार केली असून याप्रकरणी यामुळं ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डी मार्ट व संबंधित बिस्कीट कंपनीच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे….
प्रतिनिधी नागिंद मोरे



