
धुळ्यातील डीजे ची बंदी शिथिल करा, डीजे चालक मालकांचा धुळ्यात मुकमोर्चा


धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेश उत्सवापासून धुळे जिल्ह्यात डीजे वाद्यावर बंदी घालण्यात आले असून हा डीजे चालकांवर एक प्रकारे मोठा अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप डीजे चालत मला संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनावर करण्यात आला आहे.
आमच्या उदरनिर्वाचे साधन डीजे असून यामुळे अनेक कुटुंब आता उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आम्हाला पुन्हा डीजे वाजवायची परवानगी द्यावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी डीजे संघटनेच्या वतीने देण्यात आला.
धुळे शहरातून आज अग्रसेन महाराज चौक येथून विजय चालक-बालक संघटनांनी भव्य असा मूक मोर्चा काढला यावेळी हजाराच्या संख्येने डीजे चालक-मालक या मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
जिल्हा प्रशासनाने डीजेवर आणलेली बंदी ही बेकायदेशीर असून आम्ही डीजे चालक-मालक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमात व्यवसाय करत आहोत तरी देखील डिजेवर बंदी का? असा संतप्त सवाल विचारत भव्य असा मूक मोर्चा काढण्यात आला…
प्रतिनिधी नागिंद मोरे



