
नरडाणा पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरट्यांकडून १३ मोटरसायकली जप्त..


नरडाणा पोलिसांनी दमदार कामगिरी करत चोरट्याकडून 13 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत एपीआय निलेश मोरेंच्या टिमने तब्बल 8 लाख 60 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी एका चोरट्याला जेरबंद केले असून त्याचा अन्य साथीदार मात्र पसार झाला आहे. नरडाणा पोलीस ठाण्यात एमएच 18 सीडी 8675 क्रमांकाची दुचाकी चोरीची फिर्याद दाखल होती.
14 ऑगस्ट रोजी सदर दुचाकी चोरी झालेली होती. सपोनि निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असताना शिंदखेडा तालुक्यातील बावाडी येथील तुषार अमृत खैरनार या चोरट्याला पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या 13 मोटारसायकली पोलिसांना काढून दिल्या. त्याची अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार दीपक उर्फ विक्री कैलास बागुल (रा. सुरत) या चोरट्याच्या मदतीने धुळ्यासह जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातून दुचाकी चोरुन आगल्याची कबुली दिली. दीपक बागुल या चोरट्याचा शोध घेतला असता तो फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र महाले यांनी यावेळी दिली..
प्रतिनिधी नागिंद मोरे



