
धुळ्यातील हिरे महाविद्यालय बनले मृत्यूचा सापळा, शिवसेना उबाठाचा आरोप…


धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे जिल्हा रुग्णालय हे मृत्यूचा सापळा बनले असून गेल्या दोन महिन्यात या ठिकाणी शेकडो रुग्ण दगावल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे… या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा रुग्णालयाच्या विविध विभागांची भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे…
या ठिकाणी रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू देखील या अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला असून वरिष्ठ डॉक्टरांनी ठरवले तरच रुग्ण वाचू शकतो अशी या ठिकाणची परिस्थिती असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे…
प्रतिनिधी नागिंद मोरे



