
कर्जबाजारीपणाला कंटाळून शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या…


एकीकडे ओला दुष्काळामुळे शेतकरी हतबल तर दुसरीकडे कर्जमाफीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्याचा कर्जबाजरीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या; मयत शेतकऱ्याच्या कुटूंबाला बच्चु कडूंचा फोन…
एकीकडे महाराष्ट्रात ओला दुष्काळामुळे शेतकरी हतबल असताना दुसरीकडे कर्जपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात घडली आहे.भाटपुरा येथील शेतकरी जगदीश हंसराज वंजारी यांचा भाटपूरा अजनाड रस्त्यावर निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी बच्चू कडू यांनी त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला आहे… जगदीश वंजारी यांच्यावर बॅंकेसह विविध खाजगी कर्जावर बोजा होता. एल आय सीचे देखील त्यांच्यावर कर्ज होते.
धुळे मध्यवर्ती बँक व भाटपूरा विकास सोसायटीतून शेतीवर कर्ज घेतले होते.जगदीश वंजारी हे कर्जमाफीच्या आशेवर मात्र कर्जमाफी न झाल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने काही दिवसांपासून जगदीश वंजारी कर्ज फेडण्याचा विवंचनेत असतांनाच अखेर कर्जबाजरीपणाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आपले जिवन संपवले.घटनेनंतर आमदार बच्चू कडू यांनी देखील मयत शेतकरी जगदीश वंजारी यांच्याशी फोनवर संपर्क साधत धीर देत शासनाकडून मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांना संपर्क करणार असल्याचे सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे….



