
धुळ्यात प्रथमच एमडी ड्रग्सची मोठी कारवाई; तब्बल 17 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त….


धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेने आज धुळे शहरातील मोहाडी परिसरात एमडी ड्रग्सवर मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल 17 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी दोन संशयित आरोपींना एका कारसह ताब्यात घेण्यात आले आहे.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई केली. धुळ्यात प्रथमच जप्त केलेला एवढ्या महागड्या एमडी ड्रग्सचा साठा नेमका कोणाकडे जाणार होता, हे अद्याप पर्यंत समजू शकलेले नाही… सदरची धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केली असून कारवाईच्या तपासाअंती हे उघड होईल, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली..



