
धुळ्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी प्रभा परदेशींचा रास्ता रोको इशारा; पोलिसांनी घेतले ताब्यात


देवपुरातील रस्त्यांचा प्रलंबित प्रश्नांकरिता सामाजिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान कार्यकर्ते प्रभा परदेशी यांनी दिला होता रास्ता रोको करण्याचा इशारा…. मात्र पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांना घेतले ताब्यात…
इंदिरा महिला मंडळाच्या प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभा परदेशी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील एकविरा देवी मंदिर ते उत्तर मुखी मारुती मंदिर पर्यंत असलेल्या रस्त्या संदर्भात प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तसेच आंदोलन करून मागणी केली होती की या रस्त्याची सुधारणा करण्यात यावी मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौऱ्यावर येत असून सामाजिक कार्यकर्त्यांना प्रभा परदेशी या रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता…
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्यात येण्यापूर्वीच पोलिसांनी प्रभाव प्रदेश यांना ताब्यात घेतल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे…



