
धुळे तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कपाशी मका पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी चिंतेत…


धुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या… शेतकऱ्यांची मागणी
एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटरी सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्याला देखील पावसाने गेल्या दोन दिवसात चांगलेच झोडपून काढला आहे… यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून कपाशी आणि मका हा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावल्यामुळे शेतकरी आता चांगले अडचणीत सापडले आहे…

धुळे तालुक्यातील आर्णी परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी शेतकरी मोठा अडचणी सापडले आहे… या पार्श्वभूमीवर शासनाने धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे…
प्रतिनिधी: नागिंद मोरे



