
धुळ्यातील देवपुरात भीषण अपघात: एसटी बसच्या चाकाखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू, चालक ताब्यात


अतिक्रमण काढण्यात निष्फळ ठरलेल्या मनपाच्या निष्काळजीपणाचा बळी ठरले जयंत पाटील; स्थानिक नागरिकांचा मनपा विरोधात रोष….
धुळे शहरातील देवपूर भागात जुना आग्रा रोडवर लामकानी गावाकडून धुळ्याच्या दिशेने येत असलेल्या बस खाली चिरडून एका दुचाकीस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. जयवंत रामदास पाटील राहणार श्रीकृष्ण कॉलनी, देवपूर धुळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही भीषण घटना शहरातील दत्त मंदिर चौक ते जीटीपी स्टॉप दरम्यान असलेल्या यशोदा हॉस्पिटलसमोर घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरात रस्त्यालगत भाजीविक्रेते बसत असल्यामुळे या ठिकाणी मोठी रहदारीचा प्रश्न निर्माण होतो. यासंदर्भात अनेक वेळा धुळे मनपा प्रशासनाला अतिक्रमण काढून या भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर करावे अशी मागणी केली होती मात्र मनपा प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिल्याने या अतिक्रमणाचा बळी जयवंत पाटील ठरले आहे.. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे…
लामकणीकडून धुळ्याकडे येणाऱ्या एसटी बसच्या मागील चाकाखाली क्लीनरच्या बाजूने जयवंत पाटील यांची दुचाकी आल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला असून, एसटी बसच्या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे….



