
शिरपूर तालुक्यात पेट्रोल पंपावर पिस्तुलधाऱ्यांचा धुमाकूळ;22 हजार रुपयांची रोकड लुटली


शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सदाशिव पेट्रोलियम पंपावर आज पहाटे चार दरोडेखोरांनी धाडसी चोरी केली. संशयितांनी कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून 22 हजार रुपयांची रोकड हिसकावून घेतली.
दरोडेखोर एकाच दुचाकीवर आले होते, त्यातील दोन जण हातात पिस्तुल घेऊन होते आणि चेहऱ्यावर कापड गुंडाळलेले होते. पंपावर ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केला असता त्यांना मारहाणही करण्यात आली. घटनास्थळी शेजारील हॉटेल बंद आणि सुरक्षा रक्षक रजेवर असल्याचा फायदा दरोडेखोरांनी घेतला.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे घटनास्थळी दाखल झाले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.



