
धुळे; अजनाळे गावात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांचा हल्ला…


धुळे तालुक्यातील अजनाळे गावात एका जुन्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील अजनाळे गावात घडली आहे. धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पथक एका आरोपीला ताब्यात घेत असतानाच, अचानक जमलेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करत तुफान दगडफेक सुरू केली.
या हल्ल्यात पोलिसांच्या वाहनांच्या काचा फुटून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, या घटनेत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे…
तर दुसरीकडे पोलिसांनी आरोपीला कुठल्याही प्रकारचा आरोप नसताना विनाकारण तरुणांना पकडण्यासाठी वारंवार आमच्या गावात येतात. आणि महिलांना व पुरुषांना बेदम अशी मारहाण करीत असतात आम्ही त्यांच्या या त्रासाला कंटाळलो आहे पोलिसांनी गावात येऊन आमच्या घरांचे मोठे नुकसान केले आहे तर एका घरात कपाट तोडून त्यामधून तब्बल 2 लाख रुपये पोलीसच घेऊन गेले असल्याचा गंभीर आरोप गावातील एका महिलेने केला आहे…
प्रतिनिधी नागिंद मोरे



