
Dhule News धुळे शहर मतदारसंघात ११ हजार मृत मतदारांनी मतदान केल्याचा अनिल गोटे यांचा ‘गौप्यस्फोट’


धुळे: धुळे शहर विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. सन २०१९ ते २०२४ या काळात १४ हजार मतदार मृत झाले असताना, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केवळ ३,१७१ मतदार मृत असल्याचे सांगितले.
निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करणार
या आकडेवारीतील तफावत लक्षात घेता, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तब्बल ११ हजार मृत व्यक्तींच्या नावाने मतदान झाल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
हा अत्यंत गंभीर प्रकार असून, याबाबत आपण लवकरच निवडणूक आयोगाकडे पिटीशन (याचिका) दाखल करणार असल्याची माहिती अनिल गोटे यांनी दिली आहे. या गौप्यस्फोटामुळे धुळ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रतिनिधी नागिंद मोरे



