
धुळे; कचरा उचलणाऱ्यांच्या मनमानीला वैतागलेल्या भिलेश खेडकरांनी मनपा प्रवेश दारातच टाकला कचरा…


धुळे शहरातील मोगलाई मोगलाई रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते भिलेश खेडकर यांनी चक्क धुळे महापालिकेच्या प्रवेश व्दारातच कचरा टाकून शहरातील स्वच्छता आणि कचरा संकलनात मनपाकडून होणाऱ्या चालढकल कारभाराची पोलखोल केली. गेल्या सात दिवसांपासून कचरा उचलणारे घंटागाडी वाले येत नाहीत आणि आले तरी मंदिरा जवळ पडलेला कचरा उचलत नाहीत, त्यामुळे संताप व्यक्त करीत सामाजिक कार्यकर्ते भिलेश खेडकर यांनी स्वतः तो कचरा गाडीत भरुन आणला आणि मनपा प्रवेशव्दारावर टाकत मनपाच्या ढिसाळ कारभाराचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे…
याबद्दल भिलेश खेडकर यांनी सांगितले की, आमच्या भागात सात दिवसांपासून घंटागाडी येत नसून काल फोन केला तर आज येतो सांगितले. घंटागाडी आली आणि घरा घरातून कचरा गोळा केला मात्र मी साईबाबा मंदिराजवळ पडलेला हा कचरा उचलण्यास सांगितले तर कचऱ्यात माती असल्याचे म्हणत कचरा उचलण्यास नकार दिला. वास्तविक कचऱ्यात कोणतीही माती नाही, तरी देखील मनमानीपणे कचरा उचलण्यास नकार दिला. जर अशा प्रकारे मंदिराजवळच कचरा राहू देणार असतील तर मग आम्हीच तो कचरा उचलू आणि मनपा समोर टाकू, आम्हाला अशा घंटागाडी ची गरज काय? दरम्यान भिलेश खेडकर यांच्या या कृतीमुळे मनपात एकच खळबळ उडाली आहे….
प्रतिनिधी: नागिंद मोरे



