
धुळ्यात शाळकरी मुलीची छेडछाड; इंदिरा महिला मंडळाचा पोलिस अधीक्षकांना खडा सवाल


धुळे; एकीकडे ज्या पद्धतीने नाशिक पोलीस गुंडागिरी मोडीत काढून कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा अशी मोहीम राबवत असताना दुसरीकडे धुळ्यात मात्र गुन्हेगारी आणि टवाळखोरांकडून जिल्ह्याचा शहराचे विद्रूपीकरण केले जात आहे. धुळे शहरातील जिजामाता हायस्कूल जवळ टवाळखोर मुलांनी तरुणीची छेड काढत भर रस्त्यावर चक्क शाळकरी विद्यार्थिनीचा हात पकडून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला… यावेळी ती विद्यार्थ्यांनी चांगलीच भयभीत झाली आणि त्या टवाळखोरांच्या तावडीतून सुटका करून घेतली मात्र त्या टवाळखोरांनी तेथून पळ काढला….
या गंभीर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून आज इंदिरा महिला मंडळाच्या प्रमुख प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांची भेट घेत अशा टवाळखोरांविरोधात तात्काळ कठोर कारवाई करून त्यांची संपूर्ण शहरभर धिंड काढावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली…
प्रतिनिधी: नागिंद मोरे



