
धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा तूर पिकाला फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले!


धुळे प्रतिनिधी: नागिंद मोरे
संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे एकीकडे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होत असून राज्य शासनाने मदत जाहीर केल्यानंतर ती शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याआधीच पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामात बसला आहे.
धुळे जिल्ह्यात देखील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत असून काढणीला आलेला कापूस पूर्णतः सडून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
या सोबतच तूर पिकाची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती झालेले नुकसान किमान तुरीच्या उत्पादनातून भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना या पावसामुळे तूर पिकाचे देखील नुकसान झाल्याने ही अपेक्षा देखील आता शेतकऱ्यांची फोल ठरली आहे.
शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून पुन्हा एकदा व्यक्त होऊ लागली आहे…



