धुळे महापालिकेत शिंदे गट–अजित पवार गट एकत्र; महापौर-उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल
धुळे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येत ‘शहर विकास आघाडी’ स्थापन करण्यात आली असून या आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून गीता तुषार नवले यांनी महापौर पदासाठी, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अन्सारी फजलु इरफान रहेमान यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
या निवडणुकीत शहराच्या विकासाला आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य देणार असल्याचा निर्धार आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेतील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शहबाज शहा यांनी केला असून, ६ तारखेला चमत्कार घडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


