Dhule ATM Robbery; शिरपूरमध्ये मध्यरात्री गॅस कटरने एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास! धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अंबिका नगर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनला अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली असून, एटीएममधील दोन रोकड ट्रे पूर्णपणे रिकामे आढळले आहेत. काही रोकड मात्र मशीनजवळच पडलेली होती. चोरट्यांनी हे कृत्य अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर चोरटे स्विफ्ट डिझायर कारमधून मध्य प्रदेशकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, शिरपूर शहर पोलिसांच्या दोन पथकांना त्यांच्या मागावर पाठविण्यात…
Author: Team Dhule News 24
धुळे शहर कचऱ्यात गुदमरले! ‘कचरा जलावो, आयुक्त हटावो’ – शिवसेनेचं जोरदार आंदोलन धुळे, प्रतिनिधी: धुळे शहरात गेल्या आठ दिवसांपासून कचरा न उचलला गेल्यामुळे पेठ भागासह कॉलनी परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत, ज्यामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील या गंभीर समस्येसाठी महानगरपालिका आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने आज (आज) जोरदार आंदोलन केले. कचऱ्याचे ढिगारे, वाहतुकीला अडथळा समस्येची तीव्रता: गेल्या आठवड्यात मनपा आयुक्तांनी ठेकेदार बदलण्याची घोषणा केली असली तरी, सध्याच्या ठेकेदाराकडून शहरातील कोणत्याही भागातील कचरा उचलला जात नाहीये. परिणाम: यामुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले असून, संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली आहे.…
शिरपूर तालुका ‘अतिवृष्टीग्रस्त’ घोषित करा — शिरपूर फर्स्ट संघटनेची मागणी! धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे शिरपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीकविम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. संघटनेचे प्रमुख हंसराज चौधरी यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील बहुतेक भागांतील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे शेतजमिनीतील पिके पूर्णतः नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढले आहे. या अतिवृष्टीमुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या असून, या कुटुंबांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे.…
धुळ्यात शाळकरी मुलीची छेडछाड; इंदिरा महिला मंडळाचा पोलिस अधीक्षकांना खडा सवाल धुळे; एकीकडे ज्या पद्धतीने नाशिक पोलीस गुंडागिरी मोडीत काढून कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा अशी मोहीम राबवत असताना दुसरीकडे धुळ्यात मात्र गुन्हेगारी आणि टवाळखोरांकडून जिल्ह्याचा शहराचे विद्रूपीकरण केले जात आहे. धुळे शहरातील जिजामाता हायस्कूल जवळ टवाळखोर मुलांनी तरुणीची छेड काढत भर रस्त्यावर चक्क शाळकरी विद्यार्थिनीचा हात पकडून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला… यावेळी ती विद्यार्थ्यांनी चांगलीच भयभीत झाली आणि त्या टवाळखोरांच्या तावडीतून सुटका करून घेतली मात्र त्या टवाळखोरांनी तेथून पळ काढला…. या गंभीर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून आज इंदिरा महिला मंडळाच्या प्रमुख प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक…
धुळे : अकलाडच्या सरपंच आणि त्यांच्या पत्नीचा तालुका पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न प्रतिनिधी नागिंद मोरे– धुळे धुळे तालुक्यातील अकलाड गावाचे सरपंच अजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी कल्पना सूर्यवंशी यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आरोपींवर कारवाई न झाल्यामुळे घडल्याचे समजते. सूर्यवंशी दांपत्याने गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. 🔹 काय आहे प्रकरण: सरपंच अजय सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपी निलेश माधव सूर्यवंशी हा गावात मोकाटपणे फिरत असून त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर जीवघेण्या धमक्या देत आहे, अशी तक्रार केली होती. अजय सूर्यवंशी यांनी तालुका पोलीस…
धुळे : गोडाऊनवर जेसीबी फिरवून २० लाखांचे नुकसान; संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रतिनिधी : नागिंद मोरे | धुळे धुळे तालुक्यातील नेर गावात गोडाऊनवर बेकायदेशीररित्या जेसीबी फिरवून तब्बल २० लाख रुपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना तुषार भटुलाल जयस्वाल यांच्या मालकीच्या जमिनीवर घडली. जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींनी न्यायालयीन आदेशांशिवाय त्यांच्या गोडाऊनचे तोडकाम करून नुकसान केले, तरीही धुळे तालुका पोलिसांनी अद्याप कोणतीही फिर्याद नोंदवलेली नाही. जयस्वाल यांनी या संदर्भात तालुका पोलीस निरीक्षकांना लेखी तक्रार दिली असून, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत जयस्वाल यांनी सांगितले की, “मी ही जमीन ५ लाख रुपयांना…
धुळे : वडजाई–सौंदाणे रस्त्याची चाळण; ग्रामस्थांचे ‘विशेष आभार आंदोलन’ चर्चेत! धुळे तालुक्यात असलेल्या वडजाई सौंदाणे ते बाबुळवाडी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्याची चाळण झाल्याने नागरिक चांगले हैराण झाले आहे. धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ते खासदारांपर्यंत सर्वांना या संदर्भात माहिती देऊन देखील रस्त्याचे काम सुरू झाले नाही. या रस्त्याची निविदा निघून एक वर्ष उलटला आहे तरीदेखील लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्षण दिल्यामुळे त्यांचे अनोख्या पद्धतीने विशेष आभार मानत गावकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले.. त्यामुळे ग्रामस्थांनी केलेल्या या विशेष आभार आंदोलनामुळे तरी लोकप्रतिनिधींना जाग येईल आणि या रस्त्याचे काम त्वरित सुरू होईल याकरिता हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती गावकऱ्यांनी…
Dhule Job Alert | धुळ्यात नोकरीची सुवर्णसंधी! 🏦 Svasti Microfinance मध्ये भरती सुरू आहे 📌 पद: Customer Relationship Officer 📍 ठिकाण: धुळे 🎓 पात्रता (Eligibility): ✅ शिक्षण: 10वी ते 12वी ✅ वय: 20 ते 30 वर्ष ✅ अनुभव: फ्रेशर अर्ज करू शकतात (मायक्रोफायनान्स क्षेत्रात 1 वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य) 💰 पगार व फायदे: • Fixed Salary + Incentive + Travel Allowance • Gratuity + Permanent Job • Mediclaim + PF + ESIC + Official SIM Card 📞 संपर्क: HR: Yogesh 📱 मोबाईल: 8329903060 📍 मुलाखत ठिकाण (Interview Location): Svasti Microfinance House No. 76, CS No. 4053 A, Gali No. 10,…
Dhule News | धुळेकरांनो सावधान! राज्यातील पहिला मंकीपॉक्स रुग्ण आपल्या शहरात जगभरात चिंता निर्माण करणारा मंकीपॉक्स (Monkeypox) आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. राज्यातील पहिला रुग्ण धुळे शहरात आढळून आला असून, दोन्ही चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 📍 रुग्णाची माहिती धुळ्यातील गरीब नवाज नगर येथील रहिवासी हा रुग्ण चार वर्षे सौदी अरेबियात कार्यरत होता. आपल्या मुलीच्या लग्नासाठी तो २ ऑक्टोबर रोजी भारतात परतला. त्वचेवर पुरळ आणि तापाची लक्षणे दिसल्याने त्याने ३ ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणी केली. 🧪 चाचणी अहवाल आणि व्हेरियंट रक्ताचे नमुने पुण्यातील NIV (National Institute of Virology) येथे पाठवले असता दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आले. तपासणीत Clade-1 प्रकारचा व्हेरियंट आढळला…
Dhule News | धुळे जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर — महिलांना मोठा वाटा! धुळे : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून महिलांना मोठा वाटा मिळाल्याचे दिसून आले आहे. एकूण चार प्रवर्गांपैकी मागासप्रवर्ग (OBC), अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील अनेक जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 🔸 मागासप्रवर्ग (OBC) १५ जागांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव. महिला आरक्षित गावे – आर्वी, कुसुंबा, बोरकुंड, दुसाने, चिमठाणे, सोनगीर, हेंद्रुन, शिरूर. पुरुषांसाठी – लामकानी, बेटावद, मालपुर, नेर, शिंगावे, विरदेल, खलाणे. ⚪ सर्वसाधारण प्रवर्ग १५ जागांपैकी ७ जागा महिलांसाठी राखीव. महिला आरक्षित गावे – विखरण, भाटपुरा, आर्वी, कासारे,…

