धुळेकरांनो सावधान अक्कलपाडा धरणातून १८,२७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे तसेच पांझरा, मालनगाव व जामखेडी प्रकल्पांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे अक्कलपाडा धरणात येवा वाढला आहे. त्या अनुषंगाने – 📌 दि. 05/09/2025 रोजी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून ➡️ सकाळी 16,125 क्युसेक विसर्ग सुरू आहे. ➡️ सायं. 6:30 वाजता तो वाढवून 18,275 क्युसेक करण्यात येणार आहे. ➡️ येवा वाढल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येईल. ⚠️ त्यामुळे पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील तसेच धुळे शहरातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे मध्यम प्रकल्प विभाग व उपविभागीय अधिकारी, अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग यांनी केले आहे.
Author: Team Dhule News 24
धुळे तालुक्यातील फागणे गावात शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा भव्य सत्कार धुळे तालुका (प्रतिनिधी) : शिक्षक दिनानिमित्त धुळे तालुक्यातील फागणे गावात सुदीप फाऊंडेशन व उत्तर महाराष्ट्र युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास गावातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. सुदीप फाऊंडेशनचे Dr. कुणाल पाटील, वाल्मीक पाटील, नागराज पाटील, विक्रम दादा सूर्यवंशी, रामेश्वर पाटील, निखिल पवार, सागर पवार, रोहित पाटील, बंटी नारायण पाटील, संदीप पाटील, भूषण पाटील उत्तर महाराष्ट्र युवा फाऊंडेशनचे संदीप साळुंखे, भूषण सूर्यवंशी, शुभम पाटील, योगेश देसले, योगेश सूर्यवंशी, पंकज सूर्यवंशी, उमेश…
धुळ्यात शेतात सोडलेल्या करंटने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू धुळे: धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात शेताच्या तारेच्या कुंपणात सोडलेल्या विजेच्या प्रवाहामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी रात्रीच्या वेळी तारेच्या कुंपणामध्ये विद्युत प्रवाह सोडतात, मात्र हाच प्रवाह एका निष्पाप व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. बकऱ्यांसाठी चारा आणायला गेला, अन्…l ओंकार माळीच नावाचा शेतकरी आपल्या बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेला होता. याच वेळी, शेतीत सोडलेल्या करंटच्या तारेला त्याचा स्पर्श झाला आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच धुळ्यातील चितोड येथेही अशाच प्रकारची घटना घडली होती. संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होणार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात अशा प्रकारे विजेचा प्रवाह सोडणे…
थकीत वेतन मिळावे यासाठी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनाचा इशारा… धुळे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांचा गेल्या दोन महिन्यांपासून पगार एक वर्षाचा पीएफ तसेच बोनस थकीत असून धुळे महापालिका व संबंधित ठेकेदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आज सफाई कर्मचाऱ्यांनी केला. धुळे महानगरपालिकेच्या असलेल्या कचरा व्यवस्थापन डेपो या ठिकाणी शेकडो सफाई कर्मचाऱ्यांनी दोन महिन्याचा थकीत वेतन द्या अन्यथा उद्यापासून काम बंद आंदोलन करू असा इशारा देत धुळे महानगरपालिका व संबंधित ठेकेदार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली… जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा सफाई कर्मचाऱ्यांचा पगार थकला असून गेल्या एक वर्षापासून पीएफ व बोनस मिळत नसल्याने सफाई कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले…
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविण्यास परवानगी द्या, डीजे चालकांची प्रशासनाकडे मागणी… गणेशोत्सवाच्या काळात डीजे वाजविण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक- मालक संघटनेने धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी डीजे चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की, पोलीस प्रशासनाने आम्हाला विश्वासात न घेता गणेशोत्सवाच्या तोंडावर डीजेवर बंदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे डीजे व्यावसायिक आणि यावर अवलंबून असलेल्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अगोदरच धुळ्यात रोजगाराच्या संधी नाहीत. त्यात डीजे व्यवसायाच्या माध्यमातून डीजे चालक आणि कामगारांचा कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र ऐन गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालून पोलीस प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला आहे. गणेशोत्सवात डीजे वाजविण्याबाबत पोलीस प्रशासन लागू करत…
धुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर; 74 नगरसेवक निवडून जाणार महापालिकेत… 15 सप्टेंबर पर्यंत अर्कती घेण्याची मुदत; नागरिकांनी जास्तीत जास्त अर्जाती घ्याव्या मनपायुक्तांचे आव्हान… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य राज्य निवडणूक आयोगाने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध भावी नगरसेवकांना लागले असून प्रशासनाने प्रभाग रचना आज जाहीर केली आहे 2011 सालच्या जनगणनेनुसार प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली असून 19 प्रभाग धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत कायम राहणार आहेत 19 पैकी 17 प्रभागात चार नगरसेवकांची निवड केली जाणार असून उर्वरित दोन प्रभागात तीन नगरसेवक असणार आहेत धुळे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवरती आजपासून हरकती स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती प्रशासक…
धुळे अवैध धंद्यांची राजधानी? शहरात ३६७ ठिकाणी गैरव्यवहार सुरू असल्याचा राष्ट्रवादीचा दावा धुळे: धुळे शहर अवैध धंद्यांची राजधानी बनले असून, शहरात तब्बल ३६७ ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने केला आहे. या अवैध धंद्यांतून दरमहा ७५ कोटी रुपयांची उलाढाल होत असून, प्रशासन कारवाई करण्याऐवजी राजकीय प्रतिनिधींप्रमाणे वागत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला. गैरव्यवहारांची यादीच सादर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवरून सत्ताधारी पक्ष आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले. शहरात कोणत्या प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत, याची…
शिरपूर: महामार्गावर पेट्रोलिंगदरम्यान पोलीस व्हॅनला भीषण अपघात; एका पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू, दोघे जखमी धुळे, शिरपूर: मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक ३ वर पेट्रोलिंग करत असताना, शिरपूर तालुक्यातील दहिवद पोलीस मदत केंद्राच्या पोलीस व्हॅनचा भीषण अपघात झाला. अचानक टायर फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती उलटली. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, दोन गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात पोलीस अमलदार नवलसिंग वसावे यांचा मृत्यू आज दुपारी दहिवद पोलीस मदत केंद्राची पोलीस व्हॅन (क्र. एम.एच. १८ बीएक्स ०२३२) महामार्गावर पेट्रोलिंग करत होती. त्यावेळी अचानक गाडीचा पुढील टायर फुटला. यामुळे चालक नियंत्रण गमावून बसला आणि व्हॅन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघात इतका भीषण…
धुळेकरांनो सावधान! पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा धुळे, १ सप्टेंबर: धुळे जिल्ह्यात पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या कालावधीत दररोज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने ही शक्यता जास्त असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी या काळात योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.
दहिवेलमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडले; १४ लाखांची रोकड लंपास धुळे, दहिवेल: साक्री तालुक्यातील दहिवेल गावात अज्ञात चोरट्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील सुमारे १४ ते १५ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्हीवर स्प्रे मारून चोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे दोन चोरटे स्विफ्ट गाडीतून आले. त्यापैकी एकाने एटीएममध्ये प्रवेश करून सर्वप्रथम एटीएममधील कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर, त्याने गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीन कापली आणि त्यातील रोकड घेऊन दोन्ही चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलीस घटनास्थळी दाखल…

