अक्षल फाउंडेशनच्या वतीने अंध विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि शालेय साहित्याचे वाटप धुळे: अक्षल फाउंडेशन, धुळे या सामाजिक संस्थेने एका प्रेरणादायी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. संस्थेच्या वतीने, कु. अक्षल शिरसाठ हिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त येथील संतोषी माता चौकातील अंध विद्यार्थी शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या छोट्याशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. अक्षल फाउंडेशनने या वेळी विद्यार्थ्यांना कार्डशीटचे वाटप केले. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी, मच्छिंद्र देवरे (जि. प. शिक्षक, रत्नागिरी), शुद्धोधन खैरनार, लुंबिनी शिरसाठ आणि कु. अक्षल शिरसाठ हे उपस्थित होते.…
Author: Team Dhule News 24
एआयचा गैरवापर करून मुख्यमंत्र्यांची बदनामी; आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळ्यात गुन्हा दाखल केला धुळे: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी धुळ्याचे भाजप आमदार अनूप अग्रवाल यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून व्हिडिओ तयार व्हिडिओ पहा https://www.instagram.com/reel/DOBVgtqEVsq/?igsh=MXJxa3Ficm82M2pn आमदार अनुप अग्रवाल हे त्यांच्या घरी असताना हा आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्या लक्षात आला. इंस्टाग्रामवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीचा फोटो वापरून एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तो विकृत स्वरूपात तयार करण्यात…
धुळ्यात सराफा व्यापाऱ्यांवर दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; एलसीबीची यशस्वी कामगिरी धुळे, देवपूर: धुळे शहरातील सावरकर पुतळा चौक येथे बंदुकीतून गोळीबार करून सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या कुख्यात आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. तब्बल ३,५०० ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून पळून गेलेल्या आरोपींना सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. नेमके काय घडले? दिनांक २३/०७/२०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास, शहाद्याहून आलेल्या एस. टी. बसमधून व्यापारी विनय मुकेश जैन आणि त्यांचा सहकारी कर्षण रुपाभाई मोदी उतरले. त्याचवेळी एका काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून तीन अज्ञात हल्लेखोर आले. त्यांनी तोंडाला मास्क लावले होते आणि पिस्तूलचा धाक दाखवत विनय…
नगावबारी परिसरात विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू; घातपाताचा संशय, पोलीस तपास सुरू धुळे: धुळे शहरालगत असलेल्या नगाव बारी परिसरातील महाकाली मंदिराच्या जवळ एका विहिरीत पडून एका २० वर्षीय विवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आत्महत्या आहे की घातपात, याबाबत नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जात आहे, तर दुसरीकडे मेंढपाळ समाजाने हा अपघात असल्याचे म्हटले आहे. नेमके काय घडले? दुर्गाबाई साहेबराव टिळे असे मृत तरुणीचे नाव असून, ती मेंढपाळ (ठेलारी) समाजाची आहे. परिसरातील एका नातेवाईकाला ती विहिरीत पडलेली दिसली. त्यांनी तातडीने इतरांना माहिती दिली. माहिती मिळताच, ठेलारी बांधवांनी आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तरुणीला विहिरीतून बाहेर…
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी धुळे प्रशासन सज्ज; पोलीस व मनपा अधिकाऱ्यांकडून विसर्जन मार्गाची पाहणी धुळे: शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस व महानगरपालिका प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून आज दोन्ही विभागांच्या संयुक्त पथकाने शहरातील जुना आग्रा रोडवरील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. मिरवणूक मार्गाची बारकाईने तपासणी या पाहणी दौऱ्यात आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, तसेच मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या पथकाने मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची सद्यःस्थिती, धोकादायक खड्डे, मिरवणुकीला अडथळा ठरू शकणारी अतिक्रमणे,…
पावसाचा धुळ्यातील शेतकऱ्यांना फटका; टोमॅटोचे भाव घसरले, शेतकरी हवालदिल धुळे: गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता शेती पिकांना बसू लागला आहे. यामुळे टोमॅटो आणि पालेभाज्यांचे भाव कमालीचे घसरले असून, शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडले आहेत. टोमॅटो उत्पादकांचे मोठे नुकसान गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता जोरदार पुनरागमन केले आहे. या पावसामुळे टोमॅटोच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात ९०० ते १००० रुपये प्रति कॅरेट दराने विकला जाणारा टोमॅटो आता थेट २०० ते २५० रुपयांवर आला आहे. या अचानक झालेल्या भावाच्या घसरणीमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचबरोबर पालेभाज्यांचे भावही मातीमोल…
धुळ्यातील अग्रवाल नगर मित्र मंडळाने कागदाचा लगदा आणि मुलतानी माती यापासून साकारली गणेशमूर्ती.. अग्रवाल नगर येथील अग्रसेन चौक मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम… पर्यावरणासंदर्भात दिला अनोखा संदेश देत इको फ्रेंडली 19 फूट उंचीची गणपतीच्या मूर्तीची स्थापना धुळे शहरातील अग्रवाल नगर भागातील अग्रसेन चौक मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो… यंदाच्या 20 व्या वर्षी साजरा होत असलेल्या गणेशोत्सवा सोबत सामाजिक उपक्रमाचे देखील दहा दिवस आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येत असते. यंदा देखील अग्रवाल नगर अग्रसेन चौक मित्रमंडळाने गणेश उत्सव साजरा केला असून यंदा या मंडळाची 19 फूट उंचीची गणेश मूर्ती शहरात चर्चेचा विषय ठरली आहे… पर्यावरण पूरक असलेली ही…
दोंडाईचा पोलिसांची धडक कारवाई; अवैध विदेशी दारूसह दोघे जेरबंद, ६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे, दोंडाईचा: आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी धुळे पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून दोंडाईचा पोलिसांनी नंदुरबारकडे होणारी अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक पकडून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली की, एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून (क्र. MH-39-J-2869) नंदुरबारकडे अवैध विदेशी दारूची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नंदुरबार चौफुली…
धुळ्यात डीजे बंदीसाठी डॉक्टरांचा मूक मोर्चा; अनेक शाळकरी विद्यार्थी सामाजिक संघटना मोर्चात सहभागी धुळे: डीजेच्या कर्कश आवाजावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करत आज धुळे शहरातून इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) या डॉक्टरांच्या संघटनेने भव्य मूक मोर्चा काढला. ‘डीजे’मुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित या मोर्चात अनेक शाळकरी विद्यार्थी, बार असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने डीजेच्या आवाजाबाबत कठोर निर्देश दिले असले तरी, धुळे शहरासह जिल्ह्यात या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला. शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याने डीजेचा दणदणाट सुरूच असून, त्यामुळे मानवी आरोग्यावर…
साक्रीत तालुक्यात युरिया खताची टंचाई; संतप्त शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न धुळे, साक्री (प्रतिनिधी): साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. खत न मिळाल्याने संतप्त झालेल्या बोदगाव येथील दोन शेतकऱ्यांनी थेट दहिवेलच्या भर बाजारपेठेत अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित जागरूक शेतकऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली. नेमके काय घडले ? भारत सरकारच्या खते विभागाने फेब्रुवारी २०२५ मध्ये खत पुरवठा योजना जाहीर केली असली तरी, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात युरियाची कमतरता जाणवत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याच परिस्थितीला कंटाळून २८ ऑगस्ट २०२५ रोजी बोदगाव येथील शेतकरी लक्ष्मण सूर्यवंशी (वय ५४)…

