Dhule News मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर रद्द करा; धुळ्यात समता परिषदेची मागणी धुळे: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला महात्मा फुले समता परिषद आणि समस्त ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्य शासनाने काढलेला आरक्षणाचा जीआर (शासन निर्णय) तात्काळ रद्द करावा, अशी मागणी धुळे शहर व तालुका शाखेने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन केली आहे. ‘हा मूळ ओबीसींवर अन्याय’ समता परिषदेचे महानगरप्रमुख उमेश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मराठा समाजाला आरक्षण मिळावे यास आमचा पाठिंबा आहे, मात्र ते ओबीसी प्रवर्गातून देऊ नये,” असे त्यांनी सांगितले. ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशेहून अधिक जातींचा समावेश आहे, ज्यांना अद्यापही पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही.…
Author: Team Dhule News 24
सात हजारांची लाच भोवली; धुळे महापालिकेतील लाचखोर मुकरदम एसीबीच्या जाळ्यात…. सफाई कर्मचारीच्या हजेरी मधील नियमितता दाखवण्यासाठी मागितली होती लाच… धुळे महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्याची हजेरी लावून पगार नियमित काढण्यासाठी तडजोडी अंती सात हजारांची लाच स्वीकारताना धुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील मुकरदमाला धुळे एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. रवींद्र शामराव धुमाळ (50, रा.भटाई माता रिक्षा स्टॉप, मोहाडी उपनगर, ता.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या कारवाईने धुळे मनपात आज लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे… तक्रारदार हे धुळे महापालिकेतील आरोग्य विभागात प्रभाग क्रमांक 14 मध्ये सफाई कर्मचारी आहेत. सफाई कर्मचाऱ्यांवर देखरेख करण्यासाठी मुकरदम म्हणून संशयित आरोपी रवींद्र धुमाळ यांची नियुक्ती केलेली…
धुळे हादरले! माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी घटना धुळे, प्रतिनिधी: धुळे शहराला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना स्नेहनगर भागात घडली आहे. धुळे महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज सोनल शिंदे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाढदिवसानंतर अवघ्या दोन दिवसांत दुर्दैवी अंत विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच विराजचा वाढदिवस मोठ्या उत्साहात कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत साजरा करण्यात आला होता. या आनंदोत्सव साजरा झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच विराजने अशा प्रकारे आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत…
“कांद्याला दर नाही” – नगावच्या शेतकऱ्याने २५ क्विंटल कांदा सडल्याने उखीरड्यावर फेकला धुळे जिल्ह्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांना कांद्याच्या भावाभावामुळे मोठा फटका बसला आहे. मागील वर्षी ३ हजार रुपये क्विंटल दराने विकला गेलेला कांदा यंदा केवळ ५०० रुपयांवर घसरला आहे. एवढा खर्च करूनही उत्पन्न न मिळाल्याने त्यांच्या चाळीत साठवलेला तब्बल २५ क्विंटल कांदा सडून गेला. अखेर निराश होऊन त्यांनी तो कांदा उखीरड्यावर फेकावा लागला. ही व्यथा फक्त एका शेतकऱ्याची नसून संपूर्ण परिसरातील शेतकरी दरकपातीमुळे हवालदिल झाले आहेत. “सरकारकडून फक्त आश्वासने मिळतात, प्रत्यक्षात मदत मात्र नाही,” असे म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रतिनिधी – नागिंद मोरे
साक्री तालुक्यातील आश्रम शाळेत आजाराचा कहर; ६१ विद्यार्थी आजारी, १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील निवासी आश्रम शाळेत तब्बल ६१ विद्यार्थी अचानक थंडी, ताप, खोकला व सर्दीच्या आजाराने ग्रस्त झाले. या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोनाली सुनील पावरा (वय १२, रा. खरवड, ता. धडगाव, जि. नंदुरबार) या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांना उपचारानंतर पालकांच्या ताब्यात सोपविण्यात आले असून काहींना पुन्हा आश्रमशाळेत दाखल करण्यात आले आहे. शाळा प्रशासनाच्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना तब्येतीची तक्रार होती. त्यानंतर मुख्याध्यापक…
धुळ्यातून ई-वातानुकूलित बस सुरू करा; वाणी समाज संस्थेची परिवहन मंडळाकडे मागणी धुळे: महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे धुळ्यातही ई-वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेने केली आहे. धुळे जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे का, असा थेट सवाल करत, संस्थेच्या शिष्टमंडळाने आज राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली. प्रवाशांची गैरसोय आणि आर्थिक लाभ धुळे हे अनेक राष्ट्रीय महामार्गांचे केंद्र असल्याने येथून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, पुणे आणि मुंबई यांसारख्या शहरांकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. सध्या या मार्गांवर आधुनिक शिवशाही ई-बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा संस्थेने मांडला. संस्थेचे शहराध्यक्ष मोहन येवले यांच्या नेतृत्वाखालील…
साक्री-पिंपळनेर रस्त्यावर भीषण अपघात; १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर आज सकाळी बस आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात १२ वर्षीय लक्ष्मी दिनेश जयस्वाल हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात तिच्यासह तिची आई आणि इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. साक्रीहून पिंपळनेरकडे बस जात होती, तर दोन दुचाकी पिंपळनेरहून साक्रीकडे येत होत्या. कान नदीच्या पुलावर या तिन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. साक्री पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…
धुळ्यात एका तरुणावर प्राणघातक हल्ला; तरुणाची प्रकृती चिंताजनक धुळे, प्रतिनिधी: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रात्री धुळे शहरातील एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गटांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. नेमके काय घडले? गणेश विसर्जन सुरू असताना, धुळे शहरातील गल्ली क्रमांक २, कांती कॉम्प्लेक्सच्या मागे दोन गटांमध्ये वाद सुरू होते. याच वेळी प्रमोद उर्फ सोनू चित्ते (रा. देवपूर, धुळे) हा तरुण त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होता. याच प्रयत्नात असताना एका तरुणाने धारदार शस्त्राने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात प्रमोद चित्ते गंभीर जखमी झाला असून, त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची…
धुळ्यात इरशाद जहांगीरदार यांचा ‘एमआयएम’ पक्षात प्रवेश; स्थानिक राजकारणाला नवे वळण धुळे: शहरातील सुप्रसिद्ध समाजसेवक आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले इरशाद जहांगीरदार यांनी आज अखेर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. यानिमित्ताने धुळ्याच्या स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. पक्षातर्फे जोरदार स्वागत प्रदेशाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ‘एमआयएम’च्या पदाधिकाऱ्यांनी इरशाद जहांगीरदार यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पक्षाचा झेंडा प्रदान केला. इरशाद जहांगीरदार यांचा तरुणांमध्ये चांगला प्रभाव असल्याने, त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ‘एमआयएम’ला मोठा फायदा होऊ शकतो, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू…
जि.प.विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात,अभ्यासिका, वाचनालय, व्यायाम शाळेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ध नग्न आंदोलन…. नवीन प्रशासकीय इमारत तयार असताना विद्यार्थ्यांना शिकावे लागते पडक्या इमारती… धुळे तालुक्यातील वनी बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिकत असल्याची बाब समोर आली असून जिल्हा परिषद प्रशासनाची नवी इमारत तयार असताना देखील विद्यार्थ्यांना पडक्या इमारतीत शिकवले जात असल्याचा आरोप येथील विद्यार्थ्यांनी केला असून विद्यार्थ्यांनी आज अर्धनग्न आंदोलन केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासिका वाचनालय व्यायामशाळा सुविधा देखील उपलब्ध करावी अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केले आहे… गावातील विद्यार्थ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी थेट ग्रामपंचायती समोरच अर्ध नग्न आंदोलन केले जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत…

