धुळ्यात पोलिसांची मोठी कारवाई; बनावट मद्याचा मिनी कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाडा… बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त… गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आला असून आज दुपारच्या सुमारास धुळे शहरातील सहजीवन नगर भागामध्ये बनावट दारूच्या मिनी कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे संशयित आरोपी गणेश निकम हा संशयित सदर आपल्या राहत्याच घरी बनावट दारू तयार करण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिले आहे… धुळे शहरातील शासकीय दुध डेअरी परिसरात असलेल्या सहजीवन नगर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती…
Author: Team Dhule News 24
भाजपच्या राज्याची यंदा प्रथमच धुळ्यातून काढण्यात आली भव्य मिरवणूक…. भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वीच यंदा प्रथमच भाजपचा राजा, आमचा लाडका गणपती बाप्पा विराजमान होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज दुपारच्या सुमारास शहरातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. उद्या गणरायाची स्थापना घराघरांमध्ये मंडळांमध्ये होत आहे. त्यामुळे आमचे भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्या त्या भागातील गणेश मंडळाच्या ठिकाणी राहतील. म्हणूनच आज आम्ही भाजपचा राजाची मिरवणुक काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी यावेळी दिली… फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून भाजपाच्या राजाची मिरवणुक काढण्यात आली…. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी बोलताना सांगितले की, धुळे महानगरपालिकेत भाजपा पुन्हा बहुमताने निवडून येईल. भाजपाला फिफ्टी प्लस सीट गणरायाच्या…
शिरपूरात पोलीसांचा भव्य रूट मार्च; गणेशोत्सव व बकरी ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन येणाऱ्या गणेशोत्सव व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने शिरपूर शहर पोलिसांच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी तसेच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शहरातील कुंभार टेक, मारवाडी गल्ली, पाच कंदील चौक, मुख्य बाजारपेठ आदी भागातून पोलीस दलाने शिस्तबद्ध पद्धतीने संचलन केले. यावेळी पोलीस दलाच्या टवटवीत उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले…. रूट मार्चदरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून “सण हा आनंदाचा असतो, गोंधळाचा…
आग्रा ते राजगड शिवज्योत यात्रेचे धुळ्यात भव्य स्वागत; आमदार राम भदाणे यांनी व्यक्त केले विचार धुळे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘गरुडझेप’ मोहिमेचे स्मरणार्थ, आग्रा ते राजगड अशी १,३१० किलोमीटरची पायी शिवज्योत यात्रा आज नगाव (ता. धुळे) येथे दाखल झाली. यावेळी आमदार राम भदाणे यांनी या यात्रेचे स्वागत करत, छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आणि त्यांचा वसा-वारसा जपण्याचे आवाहन केले. आमदार राम भदाणे यांनी मांडले विचार यावेळी बोलताना आमदार राम भदाणे म्हणाले की, “आम्हाला या शिवज्योत यात्रेचे स्वागत करण्याचे भाग्य मिळाले, याचा आम्हाला आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आपल्यासमोर उभा राहतो. यात्रेतील मावळ्यांची लाठीकाठी प्रात्यक्षिके पाहून लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना…
धुळ्यात अन्नपूर्णा फायनान्स मध्ये भरती – सुवर्णसंधी! Annapurna Finance मध्ये नवीन भरती सुरू झाली आहे. तुमच्या करिअरची उत्तम सुरुवात करण्याची ही योग्य संधी आहे. 📌 उपलब्ध पदे व पात्रता 🔹 फील्ड क्रेडिट ऑफिसर वय: 21 ते 26 वर्षे पात्रता: 12वी पास किंवा पदवीधर अनुभव: नवशिके (Fresher) किंवा कोणत्याही पदवीधर पगार: ₹16,000 पर्यंत + इंधन खर्च ₹5000 पर्यंत + प्रोत्साहन योजना 🔹 डेव्हलपमेंट ऑफिसर वय: 22 ते 28 वर्षे पात्रता: पदवीधर अनुभव: एमएफआय किंवा बँकेत किमान 1 वर्ष पगार: ₹20,000 पर्यंत + इंधन खर्च ₹5000 पर्यंत + प्रोत्साहन योजना 🔹 असिस्टंट ब्रांच मॅनेजर वय: 22 ते 30 वर्षे पात्रता: पदवीधर अनुभव:…
🚀 Svasti Microfinance मध्ये करिअरची सुवर्णसंधी! धुळे, नंदुरबार आणि अमळनेर शाखांसाठी भरती सुरू आजच्या तरुण पिढीसमोर स्थिर नोकरी मिळवण्याचा मोठा प्रश्न आहे. खास करून ग्रामीण व उपनगरी भागात रोजगाराची संधी मर्यादित आहे. पण आता तुमच्यासाठी एक उत्तम बातमी आहे. Svasti Microfinance मध्ये Customer Relationship Officer या पदासाठी भरती सुरू झाली आहे. 📌 पदाची माहिती पदाचे नाव: Customer Relationship Officer ठिकाण: धुळे, नंदुरबार आणि अमळनेर कंपनी: Svasti Microfinance (MSME Loans, Consumer Finance सेवा) ✅ पात्रता शैक्षणिक पात्रता: 10वी ते पदवीधर वय: 20 ते 30 वर्षे अनुभव: फ्रेशर (Fresher) अर्ज करू शकतात मायक्रोफायनान्स क्षेत्रात 1 वर्ष अनुभव असलेले उमेदवार प्राधान्य 💰 पगार…
‘लाडक्या देवाभाऊसाठी राखी’ उपक्रमात धुळे भाजप ग्रामीण राज्यात अव्वल धुळे: रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने राबवलेल्या ‘लाडक्या देवाभाऊसाठी राखी’ या उपक्रमात धुळे जिल्हा ग्रामीणने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हाध्यक्षा सौ. धरतीताई देवरे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १ लाख ७१ हजार राख्या आणि शुभेच्छा पत्रांचे संकलन करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे सौ. धरतीताई देवरे यांचा विशेष सन्मान केला. ग्रामीण भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमात धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माता-भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी मोठ्या संख्येने शुभेच्छा पत्रे आणि राख्या पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आमचा देवाभाऊ’ या उपक्रमांतर्गत हे सर्व संकलन मुख्यमंत्री देवेंद्र…
शेतकऱ्यांच्या आंदोलनास्थळी आढळली महादेवाची पिंड; खदान रद्द करून मंदिर उभारण्याची मागणी धुळे, शिंदखेडा: शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावात गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला आज वेगळेच वळण मिळाले आहे. अनधिकृत खदान रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान, आंदोलनस्थळीच एक महादेवाची जुनी पिंड आढळून आली आहे. यामुळे आता याच ठिकाणी महादेवाचे मंदिर उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महिलांना मिळाली महादेवाची पिंड आज मेथी गावातील काही महिला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आल्या होत्या. खदानीचे काम नेमके कसे सुरू आहे, हे पाहण्यासाठी त्या घटनास्थळी गेल्या असता, त्यांना त्या खदानीमध्ये ही जुनी पिंड आढळून आली. या घटनेमुळे उपोषणकर्त्यांसह मेथी परिसरातील सर्व नागरिकांनी…
साक्रीजवळ महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू धुळे, साक्री: साक्री शहराजवळील धुळे-सुरत बायपास महामार्गावर, कावठे शिवारात आज एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढला साक्री नजीक असलेल्या अष्टाने आणि कावठे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचा दावा स्थानिक शेतकरी करत आहेत. महामार्गाच्या आजूबाजूच्या शेतात अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला पाहिल्याचेही त्यांनी सांगितले. या अपघातानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरात अजूनही बिबटे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, वन विभागाने तात्काळ या बिबट्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या…
साक्री: कृषी समृद्धी असूनही शेतकरी संकटात; पाणी व्यवस्थापन आणि बाजारपेठेच्या अभावामुळे विकासाला खीळ धुळे, साक्री: धुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या साक्री तालुक्यात शेती हाच अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. मात्र, अनेक आव्हानांमुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. पुरेसे पाणी असूनही योग्य नियोजनाचा अभाव, कृषीपूरक उद्योगांची कमतरता आणि मर्यादित बाजारपेठ यामुळे तालुक्यातील विकासाला खीळ बसली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष आणि पीक बदलाचे आव्हान ‘धरणांचा तालुका’ अशी साक्रीची ओळख असली, तरी सिंचनाचे योग्य नियोजन होत नसल्याने पाण्याची समस्या कायम आहे. एकेकाळी पांझरा नदीच्या खोऱ्यात ‘फड बागायत’ पद्धत प्रचलित होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती ओलिताखाली येत असे. परंतु, आता ही पद्धत कालबाह्य झाली…

