धुळे; गजानन महाराज मंदिरातून दानपेटी चोरणारे दोन सराईत चोरटे २४ तासांत जेरबंद धुळे: शहरातील गजानन कॉलनी येथील श्री गजानन महाराज मंदिरातून दानपेटी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे. नेमके काय घडले ? गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या अंधारात मंदिरातून दानपेट्या आणि दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना गजानन कॉलनीतील श्री गजानन महाराज मंदिरात घडली. दोघा चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी चोरून नेली होती. सकाळी ही बाब भाविकांच्या लक्षात आल्यावर एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने…
Author: Team Dhule News 24
धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी संपर्क प्रमुख महेश मिस्तरी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये करणार प्रवेश…. धुळे शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जुने आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे महेश मिस्तरी महानगर प्रमुख किरण जोंधळे, अमित पवार हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश होणार आहे. “अनेक वर्षे एकनिष्ठपणे पक्षाची सेवा करूनही, गरजेच्या वेळी पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला नाही,” अशी खंत महेश मिस्तरी यांनी व्यक्त केली. “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन आणि विकासाची कास धरून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा…
प्रवासी महिलेला प्रवासात फसवून सोने-चांदीची बांगडी चोरी करणारा आरोपी शिरपूर पोलिसांच्या ताब्यात… शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस पोलीसांनी अवघ्या काही दिवसांत गजाआड केले. या आरोपीने बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेला फसवून तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरल्या होत्या. चोरी गेलेल्या बांगड्यांची एकूण किंमत सुमारे 70 हजार रुपये एवढी होती. याप्रकरणी नितिनबाई सोनवणे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामध्ये प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरल्याची माहिती दिली होती. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला. मिळालेल्या पुराव्यांवरून आरोपीस…
Dhule आग्रा ते राजगड शिवज्योत यात्रेचे धुळ्यात जंगी स्वागत; ‘गरूडझेप मोहिमे’त दोन हजार मावळे सहभागी गरूडझेप मोहिम संस्थेने आग्रा ते राजगड हे 1 हजार 310 किलोमीटर पायी मोहीम शिवज्योत 17 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. 27 ऑगस्टला राजगडावर पोहचेल. आज या शिवज्योतचे धुळे शहरात आगमन होताच नागवबारी परिसरात अनेक सामाजिक, राजकीय संघटनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले… रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील, हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाची घटना म्हणजे आग्रा भेट आहे… आग्राहून औरंगजेबाच्या तब्बल 99 दिवसांच्या कैदेतून राजगडाच्या दिशेने महाराजांनी घेतलेली गरुडझेप ही या ऐतिहासिक घटनेची नोंद जगभरातील तत्कालीन राज्यकत्यांनी घेतली होती. इतिहासाला कलाटणी देणारी, विशेषतः मराठ्यांच्या इतिहासात…
धुळे; शिरुड गावात दोन गटात तुफान हाणामारी; महिलेवर केला चाकू हल्ला… मागील भांडणाचा राग डोक्यात ठेवून गावातील काही गावगुंडांनी भैय्या खैरनार यांना तुम्ही दाखल केलेली केस मागे घ्या नाहीतर तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणत त्यांच्या घरावर हल्ला करीत भैय्या खैरनार याच्या आईवर चाकू हल्ला केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास शिरुड गावात घडली… या घटनेत लक्ष्मीबाई खैरनार गंभीर जखमी झाल्या असून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे…. धुळे तालुक्यातील शिरूर गावात पुन्हा दोन गटात वाद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे… मागील भांडणाची केलेली केस मागे घेण्यासाठी गावातील भैय्या खैरनार यांच्यावर दबाव टाकत काल रात्रीच्या सुमारास भैय्या खैरनार यांच्या…

