Author: Team Dhule News 24

Dhule News धुळे शहर मतदारसंघात ११ हजार मृत मतदारांनी मतदान केल्याचा अनिल गोटे यांचा ‘गौप्यस्फोट’ धुळे: धुळे शहर विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. सन २०१९ ते २०२४ या काळात १४ हजार मतदार मृत झाले असताना, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केवळ ३,१७१ मतदार मृत असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करणार या आकडेवारीतील तफावत लक्षात घेता, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तब्बल ११ हजार मृत व्यक्तींच्या नावाने मतदान झाल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून, याबाबत आपण लवकरच निवडणूक आयोगाकडे पिटीशन (याचिका) दाखल करणार असल्याची माहिती…

Read More

धुळे तहसील कार्यालयातील आधार केंद्र चालकाची सेवा भावनेची कहाणी — स्वामींना मिळालं नवं आधार कार्ड! धुळे; सामाजिक जीवनात बाळगत असताना सर्वच ठिकाणी लागणारी प्रमुख गोष्ट म्हणजे आधार कार्ड आणि या आधार कार्ड वरूनच आपली ओळख ही आपण सांगू शकतो त्यामुळे सर्वांकडे आधार कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे… त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आधार कार्ड पासून वंचित असलेले स्वामी माधवानंद सरस्वती हे आधार कार्ड मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करून थकले असता धुळे तहसील कार्यालयातील आधार केंद्र चालक राज वानखेडकर यांनी त्यांची विचारपूस करून आपल्या संपूर्ण टीमला त्यांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी कामाला लावले… आणि पाच ते सहा तासाच्या मेहनतीनंतर अखेर स्वामी…

Read More

Dhule शिक्षणाधिकारी यांच्यावर खुर्ची जप्तीची कारवाई; न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी टाळल्याने कारवाई धुळे: गुरुदत्त विद्या प्रसारक मंडळाच्या माजी मुख्याध्यापकाचे १ कोटी ३६ लाख रुपयांचे थकीत वेतन वसूल करून देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे, धुळे न्यायालयाने अखेर शिक्षण विभागावर कारवाई केली. आज (आज) माजी मुख्याध्यापकांनी वकिलांसोबत येऊन शिक्षणाधिकारी कार्यालयातील खुर्ची जप्त केली. थकीत पगारासाठी मुख्याध्यापकाची लढाई गुरुदत्त विद्या प्रसारक संचालित आदर्श माध्यमिक विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक विश्वास पाटील यांना संस्थेच्या संचालक मंडळाने १० वर्षे पदावर असताना बेकायदेशीरपणे निलंबित केले होते आणि त्यांचा थकीत पगारही दिला नव्हता. याविरोधात विश्वास पाटील यांनी वकील ॲड.मार्फत शाळा प्राधिकरण न्यायालय, नाशिक येथे याचिका दाखल केली. कोर्टाचा निर्णय:…

Read More

धुळे; अजनाळे गावात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांचा हल्ला… धुळे तालुक्यातील अजनाळे गावात एका जुन्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील अजनाळे गावात घडली आहे. धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पथक एका आरोपीला ताब्यात घेत असतानाच, अचानक जमलेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करत तुफान दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात पोलिसांच्या वाहनांच्या काचा फुटून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, या घटनेत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे… तर दुसरीकडे पोलिसांनी आरोपीला कुठल्याही प्रकारचा आरोप नसताना विनाकारण तरुणांना पकडण्यासाठी वारंवार आमच्या गावात येतात. आणि महिलांना व…

Read More

थाळनेर पोलिसांची धडक कारवाई! अनेर डॅम परिसरात ५४ लाखांचा गांजा केला नष्ट धुळे, थाळनेर: थाळनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अनेर डॅम परिसरातील वनजमिनीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५४ लाख ३६ हजार रुपये किमतीचा गांजा नष्ट केला असून, हा धुळे जिल्ह्यातील गांजा लागवडीवरील सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक आहे. ३ एकर वनजमिनीत गांजाची लागवड थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शत्रुघ्न पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी राजपत्रित अधिकारी पो.नि. जयपाल हिरे, शासकीय पंच आणि फॉरेन्सिक पथकासह अनेर डॅम लगत असलेल्या वनजमिनीत छापेमारी केली. या छाप्यात सुमारे ३ एकर वनजमिनीत मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून २७१८…

Read More

शिरपूर तालुक्यात पेट्रोल पंपावर पिस्तुलधाऱ्यांचा धुमाकूळ;22 हजार रुपयांची रोकड लुटली शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सदाशिव पेट्रोलियम पंपावर आज पहाटे चार दरोडेखोरांनी धाडसी चोरी केली. संशयितांनी कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून 22 हजार रुपयांची रोकड हिसकावून घेतली. दरोडेखोर एकाच दुचाकीवर आले होते, त्यातील दोन जण हातात पिस्तुल घेऊन होते आणि चेहऱ्यावर कापड गुंडाळलेले होते. पंपावर ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केला असता त्यांना मारहाणही करण्यात आली. घटनास्थळी शेजारील हॉटेल बंद आणि सुरक्षा रक्षक रजेवर असल्याचा फायदा दरोडेखोरांनी घेतला. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे घटनास्थळी दाखल झाले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

Read More

Dhule News अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली पाहणी, तात्काळ मदतीची मागणी धुळे; राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट ओढवले आहे. उत्तर महाराष्ट्र विभागात विशेषतः धुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. उत्तर महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने समित्या गठित करण्यात आल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार…

Read More

धुळे शहरातील नगावबारी परिसरातील जल कुंभाला गळती लाखो लिटर पाण्याची नासाडी मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराचा नागरिकांना फटका.. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नागावबारी भागातील एमबीआर जल कुंभाच्या व्हॉल्वला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून नगावबारी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे…. एकीकडे शहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला असून धुळे मनपाच्या या गलथान कारभाराचा फटका यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे… या जलकुंबाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे मात्र दुरुस्ती वेळेवर करण्यात…

Read More

Dhule News शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या डुक्करांचा बंदोबस्त करा; शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी धुळे: धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील महामार्गालगत असलेल्या शेतांमध्ये पाळीव डुक्करांनी थैमान घातले असून, यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. पाच वर्षांपासून पिकांचे मोठे नुकसान धुळे तालुक्यातील गरताड येथील शेतकरी सुधाकर पांडुरंग पाटील यांच्या मालकीच्या शेतात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाळीव डुक्करांनी मोठा उपद्रव सुरू केला आहे. त्यांच्या बाजरी, मका आणि भुईमूग या पिकांचे डुक्कर मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. शेतकरी विजय पाटील यांनी सांगितले की, तोंडाशी आलेला घास डुकरांनी हिरावून घेतला आहे.…

Read More

धुळ्यात बचत गटाच्या पैशावर डल्ला! पोलिसांची धडक कारवाई, चोवीस तासांत सहा आरोपींना अटक धुळे (प्रतिनिधी) – धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासांत बचत गटाच्या पैशावर झालेला दरोडा उघडकीस आणत सहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून 80,700 रुपये रोख व 50,000 किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यामुळे एकूण 1,30,700 रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. घटना कशी घडली? 26 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता तक्रारदार खुशाल मोतीराम पाटील (रा. उतराण, पारोळा, जि. जळगाव) हे बाबरे गावातून बचत गटाची रक्कम गोळा करून खोरदड तांड्याकडे जात होते. शिरुड–खोरदड रस्त्यावर सहा जणांनी त्यांना अडवून मारहाण केली आणि 1.17 लाख रुपयांची लूट केली.…

Read More