धुळ्यात संतापजनक प्रकार: अडीच वर्षीय चिमुकलीच्या विनयभंग प्रकरणी ८० वर्षीय वृद्ध ताब्यात धुळे: धुळे शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात एका अडीच वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका ८० वर्षीय वृद्धाला ताब्यात घेतले आहे. या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी पकडले, पोलिसांची तात्काळ कारवाई तक्रार: विश्वकर्मा नगरमध्ये एक वृद्ध व्यक्ती लहान मुलीची छेडछाड करत असल्याची तक्रार ११२ हेल्पलाइन क्रमांकावर प्राप्त झाली होती. घटनेची वेळ: माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांची तत्परता: पोलीस पोहोचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी त्या चिमुकलीची सुटका केली होती आणि संशयित वृद्धाला पकडून ठेवले…
Author: Team Dhule News 24
धुळे; मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांवर दादा भुसे यांचा घणाघात! धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि शेतकरी मेळावा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मंत्री भुसे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत विरोधकांना याच मतदार याद्यांमुळे यश मिळालं होतं, तेव्हा त्या याद्या चांगल्या होत्या. पण आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या की विरोधकांना पोटदुखी सुरू झाली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “विधानसभेतील पराभवानंतर विरोधक मतदार याद्यांवर दोष टाकत आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील बहिणी, तरुण आणि शेतकऱ्यांनी त्यांना झटका दिला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पराभव निश्चित असल्याचं कळल्यामुळेच विरोधक खोटा प्रचार करत आहेत.” प्रतिनिधी…
धुळेतील प्रसिद्ध राम भरोसे रेस्टॉरंटला भीषण आग! सुदैवाने जीवितहानी टळली, मोठे आर्थिक नुकसान धुळे शहरातील आग्रा रोडवरील प्रसिद्ध राम भरोसे रेस्टॉरंटला आज सायंकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी सायंकाळ असल्याने हॉटेलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, स्वयंपाकघरातून अचानक धुराचे लोट दिसू लागले आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. ही घटना लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी व ग्राहकांनी तत्काळ बाहेर पळ काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमुळे रेस्टॉरंटमधील साहित्य, फर्निचर आणि उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले…
धुळे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई — घरफोडी करणारा सराईत चोर मुद्देमालासह जेरबंद धुळे (प्रतिनिधी): देवपूर परिसरातील श्रीरंग कॉलनी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केवळ दोन दिवसांत करत सराईत आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व चांदीचे दागिने असा एकूण ₹21,200 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते 27 ऑक्टोबरच्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने देवपूरमधील श्रीरंग कॉलनीतील प्लॉट नं.12 येथील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम व चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी देवपूर पोलीस स्टेशनमध्ये भाग-5 गु.र.नं.226/2025 BNS क.305, 331(4) प्रमाणे घरफोडीचा…
धुळे पोलिसांची ‘रन फॉर युनिटी’ रॅली; महिला अत्याचार व सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीचा संदेश धुळे प्रतिनिधी: नागिंद मोरे महिला अत्याचार प्रतिबंध आणि सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने धुळे पोलिसांनी आज “रन फॉर युनिटी 2025” रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागींच्या हातात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणारे प्रबोधनात्मक बॅनर झळकत होते. रॅलीला सुरुवात धुळे शहरातील बसस्थानकासमोरील पोलीस मुख्यालयातून करण्यात आली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला. “रन फॉर युनिटी” हा उपक्रम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा केला जात आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा…
धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा तूर पिकाला फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले! धुळे प्रतिनिधी: नागिंद मोरे संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे एकीकडे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होत असून राज्य शासनाने मदत जाहीर केल्यानंतर ती शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याआधीच पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामात बसला आहे. धुळे जिल्ह्यात देखील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत असून काढणीला आलेला कापूस पूर्णतः सडून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. या सोबतच तूर पिकाची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती झालेले नुकसान किमान तुरीच्या उत्पादनातून भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना या पावसामुळे तूर पिकाचे देखील नुकसान झाल्याने ही अपेक्षा देखील आता शेतकऱ्यांची फोल ठरली…
शिरपूरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा! अतिवृष्टीग्रस्त यादीत तात्काळ समावेशाची मागणी शिरपूर (धुळे) | प्रतिनिधी: नागिंद मोरे धुळे जिल्ह्याचा अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीत शिरपूर तालुक्याचा समावेश न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निषेधार्थ आज शिरपूर फर्स्ट व शिरपूर तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या पुढाकाराने शहरात एल्गार मोर्चा काढण्यात आला. करवंद नाका येथून सुरू झालेला हा मोर्चा शिरपूर तहसील कार्यालयावर संपन्न झाला. मोर्चामध्ये तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. हातात फलक, बॅनर आणि नारेबाजी करत त्यांनी राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. “शिरपूरचा अतिदृष्टी समावेश करा”, “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “आमचे हक्क आम्हाला द्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर…
Dhule ATM Robbery; शिरपूरमध्ये मध्यरात्री गॅस कटरने एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास! धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अंबिका नगर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनला अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली असून, एटीएममधील दोन रोकड ट्रे पूर्णपणे रिकामे आढळले आहेत. काही रोकड मात्र मशीनजवळच पडलेली होती. चोरट्यांनी हे कृत्य अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर चोरटे स्विफ्ट डिझायर कारमधून मध्य प्रदेशकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, शिरपूर शहर पोलिसांच्या दोन पथकांना त्यांच्या मागावर पाठविण्यात…
धुळे शहर कचऱ्यात गुदमरले! ‘कचरा जलावो, आयुक्त हटावो’ – शिवसेनेचं जोरदार आंदोलन धुळे, प्रतिनिधी: धुळे शहरात गेल्या आठ दिवसांपासून कचरा न उचलला गेल्यामुळे पेठ भागासह कॉलनी परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत, ज्यामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील या गंभीर समस्येसाठी महानगरपालिका आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने आज (आज) जोरदार आंदोलन केले. कचऱ्याचे ढिगारे, वाहतुकीला अडथळा समस्येची तीव्रता: गेल्या आठवड्यात मनपा आयुक्तांनी ठेकेदार बदलण्याची घोषणा केली असली तरी, सध्याच्या ठेकेदाराकडून शहरातील कोणत्याही भागातील कचरा उचलला जात नाहीये. परिणाम: यामुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले असून, संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली आहे.…
शिरपूर तालुका ‘अतिवृष्टीग्रस्त’ घोषित करा — शिरपूर फर्स्ट संघटनेची मागणी! धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे शिरपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीकविम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. संघटनेचे प्रमुख हंसराज चौधरी यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील बहुतेक भागांतील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे शेतजमिनीतील पिके पूर्णतः नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढले आहे. या अतिवृष्टीमुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या असून, या कुटुंबांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे.…

