Dhule Crime धुळ्यात लाचखोर अधिकाऱ्यांची साखळीच ‘एसीबी’च्या तावडीत! ३० हजारांच्या लाचेने संपवलं करिअर… धुळे जिल्ह्यात एकाचवेळी नगररचना विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील तिघे अधिकारी–कर्मचारी लाच प्रकरणात अडकल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन बिनशेती मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तिघांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत धुळे नगररचना विभागातील सहाय्यक रचनाकार कल्पेश धनलाल मोरे (वय २८, वर्ग–२), सहाय्यक आरेखक किशोर भटा भोई (वय ४३, वर्ग–३) तसेच धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक दीपक आनंद हटकर (वय ४०) यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदारांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीतील १० हजार चौरस…
Author: Team Dhule News 24
Dhule News लळींग टोलनाक्यावर मोहाडी नगर पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकसह १ कोटींचा दारूसाठा जप्त धुळे (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यातील मोहाडी नगर पोलिसांनी मद्य तस्करांविरोधात मोठी कारवाई करत लळींग टोलनाक्याजवळ ट्रकसह तब्बल १ कोटी २ लाख १६ हजार रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दारू तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येणारा एक संशयास्पद ट्रक पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी ट्रकला थांबवून तपासणी केली असता त्यात १ हजार ५०० बॉक्स विदेशी दारू आढळून आली. संबंधित दारूसाठा बेकायदेशीररित्या वाहतूक केला जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे…
Dhule Election Result; धुळे महापालिकेत भाजपची सत्ता अबाधित; ५० जागांसह प्रचंड बहुमत! धुळे : धुळे महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपने तब्बल ५० जागा जिंकत एकहाती बहुमत मिळवले असून महापालिकेवर पुन्हा एकदा आपला भगवा झेंडा डौलाने फडकवला आहे. या घवघवीत विजयाचे शिल्पकार म्हणून शहराचे आमदारच पुढे आले असून त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही ऐतिहासिक मुसंडी मारल्याचे मानले जात आहे. विरोधी पक्षांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अप) ला केवळ ०८ जागा, तर शिवसेना (शिंदे गट) ला ०५ जागा मिळाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत एमआयएमनेही जोरदार भरारी घेत १० जागांवर…
धुळे मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या घरावर दगडफेक, राजकीय वातावरण तापले धुळे | प्रतिनिधी धुळे महानगरपालिकेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला शहरात खळबळजनक घटना घडली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना आज सायंकाळी घडली. या घटनेमुळे धुळ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या दगडफेकीत मनोज मोरे यांच्या घराबाहेर ठेवलेल्या खुर्च्यांचे नुकसान झाले असून घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. घरासमोर विटांचा खच पडलेला दिसून येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी भाजपाच्या प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विलास शिंदे व त्यांच्या…
धुळे; प्रभाग 4 मध्ये हजारो मतदान कार्डांचा साठा सापडल्याने खळबळ; एमआयएमचा राष्ट्रवादीवर आरोप धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत आढळल्याचा दावा करण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा प्रकार एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला असून, याबाबत त्यांनी प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. एमआयएमच्या कार्यकर्त्यांना एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान कार्डांचा साठा आढळून आला. ही बाब समोर येताच एमआयएमने या प्रकरणावर संशय व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या मतदान कार्डांचा नेमका स्रोत काय आहे आणि ते तिथे कसे आले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी पक्षाच्या वतीने…
शिरपूरमध्ये पतंगाच्या नायलॉन मांजामुळे चार वर्षांच्या चिमुकल्याचा गळा चिरला; 15 टाके, प्रकृती स्थिर धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात नायलॉन मांजामुळे घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. पतंगाच्या मांजाने चार वर्षांच्या कपिल पिंपळे या चिमुकल्याचा गळा चिरला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. कपिल आपल्या नातेवाईकांसोबत मोटरसायकलवरून जात असताना अचानक रस्त्यात आडवा आलेला मांजा त्याच्या गळ्यात अडकला आणि जोरदार रक्तस्राव झाला. या अपघातात कपिलच्या गळ्यावर सुमारे 12 सेंटीमीटर खोल जखम झाली. त्याला तातडीने धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत 14 ते 15 टाके घालून त्याचा जीव वाचवला. सध्या कपिल आयसीयूमध्ये असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय…
धुळ्यात वडजाई रोड परिसरात एलसीबीचा छापा; पिस्तुल व जिवंत काडतुसासह आरोपी अटकेत धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सलग दुसऱ्या दिवशी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई केली आहे. वडजाई रोडवरील कबीरगंज परिसरात एका युवकाकडून देशी पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार अवैध शस्त्रांवर विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत 11 जानेवारी 2026 रोजी एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अपली हॉटेलसमोर सापळा रचण्यात आला. त्यावेळी आसीफ अहमद खलील अहमद अन्सारी (वय 31, रा. बंदे नवाज कॉलनी,…
धुळ्यात दारू तस्करांना मोठा दणका ₹30.17 लाखांची अवैध देशी दारू जप्त धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान धुळे तालुका पोलिसांनी अवैध दारू तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. मध्यरात्री गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रकवर छापा टाकून रॉकेट ब्रँडची देशी दारू, वाहनांसह एकूण ₹30,17,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. 10 जानेवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांना पारोळा ते धुळे मार्गावरून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर, विशेष पथक तयार करून मुकटी (ता. धुळे) परिसरात सापळा रचण्यात आला. रात्री 1 ते…
धुळ्यात गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त धुळे | प्रतिनिधी धुळे शहरातील गुरुद्वारा हिंसाचार आणि अडवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या मुख्य आरोपी रणबीरसिंग सुखदेवसिंग खालसा यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. धुळे पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपीच्या गुरुद्वारातील निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणानंतर रणबीरसिंग खालसा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी त्याच्या गुरुद्वारातील घराची झडती घेतली असता धक्कादायक पुरावे हाती लागले. झडतीदरम्यान ८ एमएम (KF) प्रकारच्या ८ जिवंत गोळ्या, एसएलआर रायफलसारख्या…
महाराष्ट्रातील मुसलमानांचा सर्वात मोठा नेता इम्तियाज जलील; धुळ्यात ओवेसी यांचे वक्तव्य धुळे | प्रतिनिधी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात एमआयएम पक्ष प्रमुख तथा खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना ओवेसी यांनी खासदार इम्तियाज जलील यांचे जोरदार कौतुक करत त्यांना “महाराष्ट्रातील मुसलमानांचा सर्वात मोठा नेता” असे संबोधले. ओवेसी म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये इम्तियाज जलील यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे नेतृत्व आणि जनाधार कमी झालेला नाही. निवडणुकीत पराभव झाला म्हणून नेतृत्व संपत नसते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी ओवेसी यांनी महायुतीतील नेत्यांवर जोरदार टीका केली. अजित पवार यांच्यावर बोलताना…

