धुळे शहरातील नगावबारी परिसरातील जल कुंभाला गळती लाखो लिटर पाण्याची नासाडी मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराचा नागरिकांना फटका.. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नागावबारी भागातील एमबीआर जल कुंभाच्या व्हॉल्वला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून नगावबारी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे…. एकीकडे शहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला असून धुळे मनपाच्या या गलथान कारभाराचा फटका यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे… या जलकुंबाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे मात्र दुरुस्ती वेळेवर करण्यात…
Author: Team Dhule News 24
Dhule News शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या डुक्करांचा बंदोबस्त करा; शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी धुळे: धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील महामार्गालगत असलेल्या शेतांमध्ये पाळीव डुक्करांनी थैमान घातले असून, यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. पाच वर्षांपासून पिकांचे मोठे नुकसान धुळे तालुक्यातील गरताड येथील शेतकरी सुधाकर पांडुरंग पाटील यांच्या मालकीच्या शेतात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाळीव डुक्करांनी मोठा उपद्रव सुरू केला आहे. त्यांच्या बाजरी, मका आणि भुईमूग या पिकांचे डुक्कर मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. शेतकरी विजय पाटील यांनी सांगितले की, तोंडाशी आलेला घास डुकरांनी हिरावून घेतला आहे.…
धुळ्यात बचत गटाच्या पैशावर डल्ला! पोलिसांची धडक कारवाई, चोवीस तासांत सहा आरोपींना अटक धुळे (प्रतिनिधी) – धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासांत बचत गटाच्या पैशावर झालेला दरोडा उघडकीस आणत सहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून 80,700 रुपये रोख व 50,000 किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यामुळे एकूण 1,30,700 रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. घटना कशी घडली? 26 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता तक्रारदार खुशाल मोतीराम पाटील (रा. उतराण, पारोळा, जि. जळगाव) हे बाबरे गावातून बचत गटाची रक्कम गोळा करून खोरदड तांड्याकडे जात होते. शिरुड–खोरदड रस्त्यावर सहा जणांनी त्यांना अडवून मारहाण केली आणि 1.17 लाख रुपयांची लूट केली.…
धुळे हादरले: खेळवण्याच्या बहाण्याने घरात नेले, ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांकडून फाशीची मागणी. धुळे, सोनगीर: ऐन नवरात्रीत स्त्री शक्तीचा जागर होत असतानाच, धुळे तालुक्यातील सोनगीर गावात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथे एका नराधम चुलत काकाने अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला आहे. या घृणास्पद कृत्याने सोनगीरसह संपूर्ण धुळे जिल्हा हादरला आहे. नराधमाने घरात नेऊन केला अतिप्रसंग पीडित बालिकेच्या आईने सोनगीर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, काल सायंकाळी मुलीचा चुलत काका मयुर बापू माळी (रा. सोनगीर) हा तिला खेळवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन गेला. रात्री ९ च्या सुमारास मुलगी रडू लागली आणि तिने गुप्तांग दुखत असल्याचे सांगितले. अधिक…
धुळ्यातील नकाणे गावात २० लाखांचे सुलभ शौचालय चोरीला! शिवसेना ठाकरे गट आक्रमक धुळे: धुळे महानगरपालिकेच्या कारभारावर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) वतीने गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जुन्या प्रभाग क्रमांक सहा (नकाणे गाव) मधील आदिवासी वस्तीसाठी २० लाख रुपये खर्चून बांधलेले १० आसनी सार्वजनिक शौचालय चक्क जागेवरून ‘चोरीला’ गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. २० लाख रुपये खर्च, पण शौचालय नाही! शिवसेनेचे विधी व न्याय विभागाचे प्रमुख ॲड. भूषण उर्फ बंटी पाटील यांनी माहितीच्या अधिकारात केलेल्या चौकशीतून हा भ्रष्टाचार समोर आला आहे. निधी मंजुरी: सन २०२१-२२ मध्ये महिला बालकल्याण निधी अंतर्गत नकाणे गावातील आदिवासी वस्तीत रु. १९,९८,८७८ निधी १० आसनी…
धुळे बाजारपेठेत व्यापाऱ्याच्या दुचाकीवरील लाखो रुपयांची बॅग लंपास धुळे: धुळे शहरातील ग. नं. ४ परिसरातील बाजारपेठेत एका व्यापाऱ्याच्या दुचाकीवर ठेवलेली लाखो रुपयांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी क्षणात चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पापणी लवण्याच्या आत झालेल्या या चोरीमुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नेमके काय घडले? धुळ्यातील ‘धुलीया ट्रेडर्स’चे मालक गोकुळ गंगाधर बधान हे काल रात्री ९ वाजता आपले दुकान बंद करत होते. याच वेळी त्यांची दुचाकी दुकानाबाहेर उभी होती आणि त्यावर लाखो रुपये असलेली एक पिशवी ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने क्षणाचाही विलंब न लावता ही पिशवी चोरून दुचाकीवरून पळ काढला. व्यापाऱ्याला चोरी झाल्याचे लक्षात येताच…
धुळ्यात ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या निवासस्थानासमोर संभाजी ब्रिगेडचे डफली वाजवत आंदोलन… “ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा” घोषणाबाजीने परिसर दणाणला…. राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून, धुळे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अनिल देसले यांच्या नेतृत्वात धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या निवासस्थानासमोर डफली वाजवून सरकारला जागे करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या, आणि जनावरांच्या बाजारभावानुसार…
धुळ्यातील देवपुरात भीषण अपघात: एसटी बसच्या चाकाखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू, चालक ताब्यात अतिक्रमण काढण्यात निष्फळ ठरलेल्या मनपाच्या निष्काळजीपणाचा बळी ठरले जयंत पाटील; स्थानिक नागरिकांचा मनपा विरोधात रोष…. धुळे शहरातील देवपूर भागात जुना आग्रा रोडवर लामकानी गावाकडून धुळ्याच्या दिशेने येत असलेल्या बस खाली चिरडून एका दुचाकीस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. जयवंत रामदास पाटील राहणार श्रीकृष्ण कॉलनी, देवपूर धुळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही भीषण घटना शहरातील दत्त मंदिर चौक ते जीटीपी स्टॉप दरम्यान असलेल्या यशोदा हॉस्पिटलसमोर घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरात रस्त्यालगत भाजीविक्रेते बसत असल्यामुळे…
शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर; कोट्यवधींचे पीक जमिनदोस्त शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव, वसमाने, कळगाव, कुंभारे परिसरात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने पपई, केळी, मका, कापूस मिरची यासह आदी पिके जमिनदोस्त झाली. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन, कपाशी, तूर यासारखी खरीप पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शासनाने तात्काळ मदतीची घोषणा करून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती जलमय झाली असून सोयाबीन पिकावर कोंब फुटल्याने पीक घरात येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. कपाशीचे बोंड, पात्या, फुले उन्मळून खाली पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांना तडा गेला आहे…. प्रतिनिधी:…
धुळे तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कपाशी मका पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी चिंतेत… धुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या… शेतकऱ्यांची मागणी एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटरी सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्याला देखील पावसाने गेल्या दोन दिवसात चांगलेच झोडपून काढला आहे… यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून कपाशी आणि मका हा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावल्यामुळे शेतकरी आता चांगले अडचणीत सापडले आहे… धुळे तालुक्यातील आर्णी परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी शेतकरी मोठा अडचणी सापडले आहे… या पार्श्वभूमीवर शासनाने धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ…

