धुळे: इच्छुक उमेदवाराचा हटके प्रयोग — 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिला वचननामा; भाजपाकडे उमेदवारीची मागणी करणार धुळे प्रतिनिधी: नागिंद मोरे धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांकडून वेगवेगळे अनोखे प्रयोग पाहायला मिळत आहेत. असाच एक हटके प्रयोग धुळे शहरातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार यांनी केला आहे. सोनार यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपला वचननामा आणि हमीपत्र लिहून, हा स्टॅम्प पेपर भारतीय जनता पक्षाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारीची मागणी करणार असल्याचे सांगितले. वचननाम्यातील महत्त्वाचे मुद्दे: निवडून आल्यास विकासकामांच्या ठेक्यात सहभागी होणार नाही. नगरसेवक पदाचा उपयोग वैयक्तिक संपत्ती मिळविण्यासाठी करणार नाही.…
Author: Team Dhule News 24
धुळे: शाळेतील मुख्याध्यापक आणि उपशिक्षक १५ हजारांची लाच घेताना रंगेहात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई धुळे जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वेतनवाढ सुरू करणे आणि वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापक आणि उपशिक्षकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई (दि. ११) मांजरोद (ता. शिरपूर) येथे करण्यात आली. जनता शिक्षण प्रसारक संस्था, बेटावद (ता. शिंदखेडा) संचलित महात्मा गांधी विद्यालय, मांजरोद येथील मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील (वय ५६) आणि उपशिक्षक गोपाल रघुनाथ पाटील (वय ४७) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे त्याच संस्थेच्या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.…
शिरपूर तालुक्यात झेंडू फुलांना भाव नाही; संतप्त शेतकऱ्याने सोन्यासारख्या पिकावर फिरवला रोटाव्हेटर! शिरपूर, धुळे; झेंडूला चांगले बाजारभाव मिळतील म्हणून एक एकर शेतात कलकत्ता झेंडूची लागवड केली. सुरूवातीला चांगले बाजारभाव ही मिळाले पण आता बाजारभाव कोसळल्याने झेंडूची फुले तोडणे सुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी चांगलेच वैतागले असून शिरपूर तालुक्याच्या शिंगावेभागातील मुकुल महेंद्र पाटील या शेतकऱ्याने सोन्या सारख्या असलेल्या एक एकर झेंडूवर रोटाव्हेटर फिरवला आहे. शिंगावे शिवारातील मुकुल पाटील यांची शेती आहे. त्यांनी आडीच ते तीन महिन्यांन पूर्वी कलकत्ता झेंडूचे रोपे विकत घेवून एक एकर शेतात या झेंडूची लागवड केली होती. त्यासाठी फवारणी, खते औषधे यांचा मोठा खर्च केला.…
Dhule News : धुळे पोलिसांची मोठी कामगिरी – सात घरफोड्यांचा आरोपी अखेर पकडला! दिल्ली आणि अहमदनगर येथे घरफोड्या करणारा अटळ गुन्हेगार अखेर धुळे पोलिसांच्या हाती लागला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे झाशी राणी पुतळ्याजवळ संशयितास अटक केली. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास घेतला असता, त्याची ओळख सोपान सोमनाथ पाटील (वय २९, रा. वणी, ता. धुळे) अशी पटली. प्राथमिक चौकशीत त्याने दिल्ली आणि अहमदनगर येथे घरफोड्यांची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी अहमदनगरच्या भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सोपान हा फरार होता. सदर आरोपीविरुद्ध दिल्ली व अहमदनगरमधील…
धुळ्यात संतापजनक प्रकार: अडीच वर्षीय चिमुकलीच्या विनयभंग प्रकरणी ८० वर्षीय वृद्ध ताब्यात धुळे: धुळे शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात एका अडीच वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका ८० वर्षीय वृद्धाला ताब्यात घेतले आहे. या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी पकडले, पोलिसांची तात्काळ कारवाई तक्रार: विश्वकर्मा नगरमध्ये एक वृद्ध व्यक्ती लहान मुलीची छेडछाड करत असल्याची तक्रार ११२ हेल्पलाइन क्रमांकावर प्राप्त झाली होती. घटनेची वेळ: माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांची तत्परता: पोलीस पोहोचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी त्या चिमुकलीची सुटका केली होती आणि संशयित वृद्धाला पकडून ठेवले…
धुळे; मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांवर दादा भुसे यांचा घणाघात! धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि शेतकरी मेळावा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मंत्री भुसे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत विरोधकांना याच मतदार याद्यांमुळे यश मिळालं होतं, तेव्हा त्या याद्या चांगल्या होत्या. पण आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या की विरोधकांना पोटदुखी सुरू झाली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “विधानसभेतील पराभवानंतर विरोधक मतदार याद्यांवर दोष टाकत आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील बहिणी, तरुण आणि शेतकऱ्यांनी त्यांना झटका दिला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पराभव निश्चित असल्याचं कळल्यामुळेच विरोधक खोटा प्रचार करत आहेत.” प्रतिनिधी…
धुळेतील प्रसिद्ध राम भरोसे रेस्टॉरंटला भीषण आग! सुदैवाने जीवितहानी टळली, मोठे आर्थिक नुकसान धुळे शहरातील आग्रा रोडवरील प्रसिद्ध राम भरोसे रेस्टॉरंटला आज सायंकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी सायंकाळ असल्याने हॉटेलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, स्वयंपाकघरातून अचानक धुराचे लोट दिसू लागले आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. ही घटना लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी व ग्राहकांनी तत्काळ बाहेर पळ काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमुळे रेस्टॉरंटमधील साहित्य, फर्निचर आणि उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले…
धुळे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई — घरफोडी करणारा सराईत चोर मुद्देमालासह जेरबंद धुळे (प्रतिनिधी): देवपूर परिसरातील श्रीरंग कॉलनी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केवळ दोन दिवसांत करत सराईत आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व चांदीचे दागिने असा एकूण ₹21,200 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते 27 ऑक्टोबरच्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने देवपूरमधील श्रीरंग कॉलनीतील प्लॉट नं.12 येथील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम व चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी देवपूर पोलीस स्टेशनमध्ये भाग-5 गु.र.नं.226/2025 BNS क.305, 331(4) प्रमाणे घरफोडीचा…
धुळे पोलिसांची ‘रन फॉर युनिटी’ रॅली; महिला अत्याचार व सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीचा संदेश धुळे प्रतिनिधी: नागिंद मोरे महिला अत्याचार प्रतिबंध आणि सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने धुळे पोलिसांनी आज “रन फॉर युनिटी 2025” रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागींच्या हातात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणारे प्रबोधनात्मक बॅनर झळकत होते. रॅलीला सुरुवात धुळे शहरातील बसस्थानकासमोरील पोलीस मुख्यालयातून करण्यात आली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला. “रन फॉर युनिटी” हा उपक्रम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा केला जात आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा…
धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा तूर पिकाला फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले! धुळे प्रतिनिधी: नागिंद मोरे संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे एकीकडे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होत असून राज्य शासनाने मदत जाहीर केल्यानंतर ती शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याआधीच पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामात बसला आहे. धुळे जिल्ह्यात देखील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत असून काढणीला आलेला कापूस पूर्णतः सडून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. या सोबतच तूर पिकाची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती झालेले नुकसान किमान तुरीच्या उत्पादनातून भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना या पावसामुळे तूर पिकाचे देखील नुकसान झाल्याने ही अपेक्षा देखील आता शेतकऱ्यांची फोल ठरली…

