Dhule News धुळ्यातील शिंदखेड्यात भीषण अपघात; मद्यधुंद ‘छोटा हत्ती’ चालकाने विद्यार्थिनीला उडवलं
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील भगवा चौक परिसरात एक हृदयद्रावक अपघात घडला असून मद्यधुंद अवस्थेतील छोटा हत्ती (मालवाहतूक वाहन) चालकाने धडक दिल्याने शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिल्टर पाण्याचे जार वाहून नेणारा छोटा हत्ती चालक ओव्हरटेक करत असताना पायी चालत जाणाऱ्या प्रियंका कोळी (वय 21 वर्षे) या विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की प्रियंका यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मद्यधुंद वाहन चालवणाऱ्या चालकामुळे निष्पाप विद्यार्थिनीचा जीव गेल्याने संतप्त नागरिकांनी संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपी चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
https://www.instagram.com/reel/DT0dVQsCA4k/?igsh=MWxxbTZpanJ1am5vcA==

