Author: Team Dhule News 24

धुळे महानगरपालिका निवडणूक : अजित पवार गटाची राष्ट्रवादी स्वबळावर; महायुतीत फूट स्पष्ट धुळे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्रितपणे लढवणार असल्याचे स्पष्ट झाले असताना, दुसरीकडे महायुतीत मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी धुळे महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या निवडणूक सुकाणू समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. फारुक शहा यांनी दिली. डॉ. फारुक शहा यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे आतापर्यंत 74 जागांसाठी तब्बल 220 इच्छुकांनी उमेदवारी…

Read More

साक्री–पिंपळनेर परिसरात शेतमाल चोरी करणारी टोळी जेरबंद; 9.85 लाखांचा मुद्देमाल जप्त साक्री | धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे साक्री आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातून कापूस, सोयाबीन व बाजरी चोरी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या संयुक्त कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पिकअप वाहनासह एकूण 9 लाख 85 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून साक्री तालुक्यात शेतमाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखा…

Read More

धुळे : इन्स्टाग्राम स्टेटसवर ‘गुड बाय’; तापी नदीत उडी घेऊन २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या प्रतिनिधी नागिंद मोरे| धुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील उमेश राजेंद्र पाटील (वय २२) या तरुणाने तापी नदीवरील पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. उमेश पाटील हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. तो रोजगारानिमित्त सुरत येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. यात्रेनिमित्त दोन दिवसांपूर्वीच तो आपल्या मूळ गावी वाडी खुर्द येथे आला होता. आत्महत्येपूर्वी उमेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तापी नदीच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा सेल्फी शेअर करत त्यावर ‘गुड बाय’ असे स्टेटस ठेवल्याचे…

Read More

धुळ्यात आंतरराज्यीय घरफोडी टोळी गजाआड; 15.60 लाखांचे सोने जप्त, 6 गुन्ह्यांची उकल धुळे : धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक करून पोलिसांनी सहा घरफोडी गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 15 लाख 60 हजार रुपये किमतीचे 120 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत केली आहे. दिनांक 24 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान कुसुंबा (ता.जि. धुळे) येथे वसंतराव राजाराम चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याच कालावधीत कुसुंबा, नेर, मोराणे, कुंडाणे व अकलाड या…

Read More

शिरपूरात जळालेल्या कारमध्ये मानवी कवटी; रहस्यमय घटनेने परिसरात खळबळ शिरपूर, धुळे : शिरपूर तालुक्यातील टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर आज पहाटे घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक कार पूर्णतः जळून खाक झालेली आढळून आली असून, या जळालेल्या वाहनात मानवी हाडे व कवटी सापडल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. ही कार मारुती सुझुकी (क्रमांक GJ-06-JO-6325) असून ती चंद्रकांत प्रताप धनगर (वय 43, रा. खामखेडा, ह.मु. सुरत) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. जळालेल्या वाहनात आढळलेली मानवी कवटी व हाडे ही चंद्रकांत धनगर यांचीच असावीत, असा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर बन्सीलाल दगडू…

Read More

धुळ्यात पहाटे धाडसी चोरी; खोलगल्लीतील भांडे दुकानातून 1 लाख 90 हजारांची रोकड लंपास धुळे : धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या खोलगल्ली भागात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. खोलगल्ली क्रमांक 4 येथील ‘रमणलाल पूनमचंद जैन’ या प्रसिद्ध भांडे दुकानात पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दुकानाचे मालक वरच्या मजल्यावर झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. प्राथमिक माहितीनुसार ही चोरी पहाटे दोन वाजेनंतर घडली असून, चोरट्याने दुकानातील 1 लाख 80 हजार रुपये रोख आणि आठ ते दहा हजार रुपयांची चिल्लर, असा एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सकाळी सुमारे…

Read More

धुळ्यात भिक्षेकरी वृध्देचा निर्घृण खून; मनगटी घड्याळामुळे 24 तासांत आरोपी गजाआड धुळे : मोहाडी उपनगरातील वाल्मिकी आंबेडकर वसाहतीत राहणाऱ्या 75 वर्षीय भिक्षेकरी लीलाबाई हिरामण सुर्यवंशी यांचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केलेल्या आरोपीला लीलाबाईंनी प्रतिकार केल्याने आरोपीने धारदार स्टिलच्या खुरपीने त्यांच्या गुप्तांगात वार करून खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. घटनास्थळी मिळालेल्या मनगटी घड्याळाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली. घड्याळाचा फोटो गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला. त्यावरून संशयित सागर राजू कोळी (वय 25) याची…

Read More

धुळे: जबरी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह केले जेरबंद धुळे | प्रतिनिधी दोंडाईचा–शिंदखेडा परिसरात जबरी चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्यास धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत त्याच्याकडून सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. दि. 01 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास, फिर्यादी जितेंद्र साहेबराव पवार (रा. महादेवपुरा, दोंडाईचा, ता. शिंदखेडा) हे जी.टी.पी. स्टॉप येथे एस.टी. बसची वाट पाहत उभे असताना, अज्ञात चोरट्याने अंधाराचा फायदा घेत त्यांच्या हातातील मोबाईल फोन, पाकीट व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून पलायन केले होते. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाणे येथे दि. 13/12/2025…

Read More

धुळे हादरले: मोहाडी उपनगरात 70 वर्षीय वृद्ध महिलेची घरातच निर्घुण हत्या; चोरीचाही संशय धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे धुळे शहरातील मोहाडी उपनगरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वाल्मीक वसाहतीत राहणाऱ्या लीलाबाई हिरामण सूर्यवंशी (वय 70) यांची त्यांच्या घरातच निर्घुण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर घरातील साहित्य चोरीला गेल्याचेही उघड झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लीलाबाई सूर्यवंशी या अत्यंत हलाखीचे जीवन जगत होत्या. परिसरात भीक मागून त्या आपली उपजीविका करत होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने त्या घरात एकट्याच राहत होत्या. याच परिस्थितीचा फायदा घेत अज्ञात आरोपींनी त्यांच्या घरात प्रवेश करून…

Read More

धुळ्यात भीषण अपघात; कार दुरुस्त करताना मेकॅनिकलचा ट्रकच्या धडकेत मृत्यू धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे धुळे तालुक्यातील नगाव गाव शिवारात मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी भीषण अपघाताची घटना घडली. रस्त्यावर नादुरुस्त झालेली कार दुरुस्त करत असतानाच मागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने जुनेद पठाण (वय अंदाजे ३०) या तरुण मेकॅनिकलचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 🚗 अपघात कसा घडला? मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई–आग्रा महामार्गावर नगाव शिवारात एक कार अचानक बंद पडली होती. कार दुरुस्तीसाठी धुळे शहरातून मेकॅनिकल जुनेद पठाण यांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते. ते कार दुरुस्त करण्याचे काम करत असतानाच मागून आलेल्या भरधाव…

Read More