मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – e-KYC अशी करा 📢 महत्वाची सूचना महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना e-KYC करणे बंधनकारक केले आहे. 👉 जर तुम्ही e-KYC पूर्ण केले नाही तर तुम्हाला मिळणारा दरमहा ₹1500 चा लाभ बंद होऊ शकतो. ✅ e-KYC का करावे? दरमहा मिळणारे 1500 रुपये वेळेवर मिळतील खोटे लाभार्थी बाद होतील व खरी लाभार्थींचा हक्क सुरक्षित राहील भविष्यातील शासकीय योजना व अनुदानासाठी उपयुक्त संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व सुरक्षितता 🗓️ शेवटची तारीख आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. 📑 आवश्यक कागदपत्रे 1️⃣ आधार कार्ड 2️⃣ बँक खाते क्रमांक व IFSC…
Author: Team Dhule News 24
धुळ्यातील डीजे ची बंदी शिथिल करा, डीजे चालक मालकांचा धुळ्यात मुकमोर्चा धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेश उत्सवापासून धुळे जिल्ह्यात डीजे वाद्यावर बंदी घालण्यात आले असून हा डीजे चालकांवर एक प्रकारे मोठा अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप डीजे चालत मला संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनावर करण्यात आला आहे. आमच्या उदरनिर्वाचे साधन डीजे असून यामुळे अनेक कुटुंब आता उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आम्हाला पुन्हा डीजे वाजवायची परवानगी द्यावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी डीजे संघटनेच्या वतीने देण्यात आला. धुळे शहरातून आज अग्रसेन महाराज चौक येथून विजय चालक-बालक संघटनांनी भव्य असा मूक मोर्चा काढला यावेळी हजाराच्या…
Dhule News भाजी विक्रेत्यांच्या बैठकीत भाजप ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा…. गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरात पाच कंदील भागात मनपा ने घेतलेल्या नो हॉकर्स झोनच्या निर्णयाविरोधात किरकोळ भाजी विक्रेते चांगलेच आक्रमक झाले आहे… प्रशासनाने गांधी पुतळा ते पाच कंदील परिसरात केलेला नो हॉकर्स झोन विरोधात भाजी विक्रेत्यांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे.. तर दुसरीकडे भाजपाचा एक गट या निर्णयाचे स्वागत करीत आहे आता यावरून चांगलेच रणकंदन पेटले आहे…. आज भाजी विक्रेते आणि सर्वपक्षीय बैठक धुळे जिल्हाधिकारी कार्यालया नियोजन हॉल येथे आयोजित करण्यात आली होती… यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या आपली बाजू मांडत असताना भाजपचे माजी नगरसेवक हिरामण…
ऊसाच्या पिकात लपविलेला 16 लाखांचा गांजा शिरपूर तालुका पोलिसांनी केला जप्त…. शिरपूर तालुक्यातील आंबे शिवारातील रुपसिंगपाडा परिसरात शिरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करून तब्बल 229 किलो सुका गांजा जप्त केला. त्याची किंमत 16 लाख रुपय इतकी आहे. ऊसाच्या पिकात हा गांजा लपवलेला होता. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात केलेल्या या कारवाई प्रकरणी एका विरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने रुपसिंगपाडा येथील रूपसिंग दर्गा पावरा त्याचे घराच्या पाठीमागील शेतातमध्ये छापा टाकला. ऊसाचे पिकाचे लागवड केलेल्या क्षेत्रात तपासणी केल्यावर पत्र्याच्या कोठीत व चार निळ्या प्लास्टिकच्या…
महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा अक्षरशः पाऊस, तब्बल सहाशे पाच हरकती दाखल… प्रभाग क्रमांक चार मधील हिंदू नागरिकांचा पाच मध्ये समावेश करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने तयारीला वेग देण्यात आला आहे… या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्यानंतर या प्रभाग रचनेच्या संदर्भात हरकती मागविण्यात आल्या होत्या धुळे महापालिकेच्या प्रभाग रचनेनंतर या हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला असून तब्बल 605 हरकती दाखल झाले आहेत… विशेष म्हणजे यातील सर्वाधिक हरकती या प्रभाग क्रमांक चार मधून असून महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये हिंदू मतदारांचा समावेश करण्यात आला असून याठिकाणी…
AI चा फोटो व्हिडिओ ट्रेंड फॉलो करताय तर वेळीच व्हा अलर्ट, सायबर तज्ञांचा इशारा… सध्या सोशल मीडियावर गूगल गिमिनीचा नॅनो बनाना AI साडी ट्रेंड सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. युजर्स आपल्या साध्या फोटोंना 90s बॉलीवुड स्टाइल साडी लूक देत आहेत, शिफॉन साड्या आणि गोल्डन लाइटिंगसह स्लायलिश फोटो जनरेट करत आहेत…. हा ट्रेंड मजेदार जरी वाटत असला, तरी यामुळे आपली प्रायव्हसी धोकेही वाढले आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा असे आवाहन धुळ्यातील सायबर तज्ञ ॲड चैतन्य भंडारी यांनी केले आहे… गुगल जेमिनी नॅनो बनाना 3D स्टाईल ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, परंतु सायबर तज्ज्ञांनी वैयक्तिक फोटो अपलोड करण्याच्या जोखमीं…
धुळे डी मार्ट येथून घेतलेल्या बिस्किट मध्ये आढळल्या आळ्या, ग्राहकाची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार धुळे शहरातील डी मार्ट येथून एका ग्राहकाने गुड डे बिस्किट खरेदी केल्यानंतर ते घरी घेऊन आल्यावर अनिकेत बिरारी यांच्या मुलीने आणि त्यांच्या पत्नीने ते बिस्किट खाल्ल्यानंतर त्या बिस्कीट मध्ये बुरशी लागलेली असून मोठ्या प्रमाणात आळ्या आढळून आल्या.. यासंदर्भात संबंधित ग्राहक असलेल्या अनिकेत बिरारी यांनी धुळे येथील अन्न औषध प्रशासन गाठत डी मार्ट संदर्भात तक्रार केली… तसेच धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील लेखी तक्रार केली असून याप्रकरणी यामुळं ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डी मार्ट व संबंधित बिस्कीट कंपनीच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे…. प्रतिनिधी नागिंद…
धुळे जिल्ह्यात भीषण अपघात! दोन ट्रकची समोरासमोर धडक; एक ठार, ७० बकऱ्यांचा मृत्यू मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे साडेचार वाजता झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात 60 हून अधिक बकऱ्यांचा मृत्यू झाला असून महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मध्यप्रदेश येथून शिरपूरच्या दिशेने बकऱ्यांनी भरलेला ट्रक येत असताना बिजासनी घाट परिसरातील भिलट बाबा मंदिराजवळ मागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेत बकऱ्यांचा ट्रक उलटला तर दुसरा ट्रक लोखंडी रेलिंगवर आदळून चक्काचूर झाला. अपघातात राजू सलीम कुरेशी (मृत), तर जावेद कुरेशी व दीपक वर्मा (गंभीर जखमी) असून त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल…
Dhule News धुळेतील दहावीचा विद्यार्थी जयकुमार अखेर सापडला!पश्चिम देवपूर पोलिसांच्या अथक परिश्रमांना यश… धुळे (देवपूर) येथील चावरा शाळेचा दहावीचा विद्यार्थी जयकुमार उर्फ साई उज्ज्वल जाधव (वय १५) हा १० सप्टेंबर रोजी शाळेला जाताना बेपत्ता झाला होता. सहा दिवस शोध घेतल्यानंतर अखेर पश्चिम देवपूर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून जयकुमारला मध्यप्रदेशातील पिथमपूर येथे सुखरूप सापडला आहे. जयकुमार शाळेत जात असताना अचानक गायब झाला होता. महामार्गावरील अनेक ढाबे, मंदिरे, हॉटेल्स – पोलिसांनी पालथे घातले होते. सुमारे ५० ते १०० ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. यात सोनगीर, शिरपूर, सेंधवा, पळासनेर, उज्जैन येथील टोलनाक्यांचेही सीसीटीव्ही फुटेज बघण्यात आले. यासह उज्जैन येथील महाकालच्या मंदिराचेही सीसीटीव्ही…
शिरपूर: कॉलेज विद्यार्थ्याची आत्महत्या, गळफास घेऊन जीवन संपवले धुळे, शिरपूर: शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ असलेल्या एस.व्ही.के.एम. च्या निम्स (NIMS) कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अथर्व राजपुरोहित (रा. खरगोन, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट अथर्व राजपुरोहित हा निम्स कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. त्याने कॉलेज परिसरातील एका वसतिगृहात गळफास घेतला. ही घटना रात्री उशिरा घडल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे कॉलेज परिसरात खळबळ उडाली आहे. अथर्वच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली असून,…

