Dhule News धुळेतील दहावीचा विद्यार्थी जयकुमार अखेर सापडला!पश्चिम देवपूर पोलिसांच्या अथक परिश्रमांना यश… धुळे (देवपूर) येथील चावरा शाळेचा दहावीचा विद्यार्थी जयकुमार उर्फ साई उज्ज्वल जाधव (वय १५) हा १० सप्टेंबर रोजी शाळेला जाताना बेपत्ता झाला होता. सहा दिवस शोध घेतल्यानंतर अखेर पश्चिम देवपूर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून जयकुमारला मध्यप्रदेशातील पिथमपूर येथे सुखरूप सापडला आहे. जयकुमार शाळेत जात असताना अचानक गायब झाला होता. महामार्गावरील अनेक ढाबे, मंदिरे, हॉटेल्स – पोलिसांनी पालथे घातले होते. सुमारे ५० ते १०० ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. यात सोनगीर, शिरपूर, सेंधवा, पळासनेर, उज्जैन येथील टोलनाक्यांचेही सीसीटीव्ही फुटेज बघण्यात आले. यासह उज्जैन येथील महाकालच्या मंदिराचेही सीसीटीव्ही…
Author: Team Dhule News 24
शिरपूर: कॉलेज विद्यार्थ्याची आत्महत्या, गळफास घेऊन जीवन संपवले धुळे, शिरपूर: शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ असलेल्या एस.व्ही.के.एम. च्या निम्स (NIMS) कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अथर्व राजपुरोहित (रा. खरगोन, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट अथर्व राजपुरोहित हा निम्स कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. त्याने कॉलेज परिसरातील एका वसतिगृहात गळफास घेतला. ही घटना रात्री उशिरा घडल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे कॉलेज परिसरात खळबळ उडाली आहे. अथर्वच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली असून,…
Dhule News धूळ खात पडलेल्या रस्त्यामुळे धुळेकर संतप्त; प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध धुळे: शहरातील नेहरूनगर परिसरातील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक संतप्त झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आज संतप्त नागरिकांनी महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून जोरदार निषेध व्यक्त केला. अपघातांमुळे दोन जणांचा बळी या रस्त्याचे काम मनपा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या समन्वयाने सुरू करण्यात आले होते. मात्र, रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत दोघांना…
Dhule News मुसळधार पावसामुळे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत धुळे: धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाची प्रतीक्षा संपल्यानंतर आता अतिवृष्टीमुळे पिके धोक्यात आली आहेत. विशेषतः कपाशीच्या पिकावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघण्याचीही भीती आर्णी गावातील शेतात लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. या रोगामुळे कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान होत असून, हातातून पीक जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या गंभीर समस्येवर शासनाने तातडीने उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर…
Dhule Crime सुट्ट्या पैशांवरून वाद; धुळ्यात रिक्षाचालकाकडून महिलेला बेदम मारहाण धुळे: धुळ्यात सुट्ट्या पैशांवरून झालेल्या वादानंतर एका रिक्षाचालकाने महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रिक्षाचालकाने त्या महिलेच्या चार वर्षांच्या मुलीलाही मारहाण केली. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके काय घडले? राणी शिवदे नावाच्या महिलेने नरेंद्र अहिरे नावाच्या रिक्षाचालकाच्या रिक्षातून सावरकर पुतळा येथे प्रवास केला. भाडे दिल्यावर महिलेने पाचशे रुपयांची नोट दिली. रिक्षाचालकाने सुट्ट्या पैशांची मागणी केली असता महिलेकडे सुट्टे पैसे नव्हते. यावरून रिक्षाचालकाने महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादानंतर परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राणी शिवदे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,…
Dhule News मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर रद्द करा; धुळ्यात समता परिषदेची मागणी धुळे: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला महात्मा फुले समता परिषद आणि समस्त ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्य शासनाने काढलेला आरक्षणाचा जीआर (शासन निर्णय) तात्काळ रद्द करावा, अशी मागणी धुळे शहर व तालुका शाखेने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन केली आहे. ‘हा मूळ ओबीसींवर अन्याय’ समता परिषदेचे महानगरप्रमुख उमेश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मराठा समाजाला आरक्षण मिळावे यास आमचा पाठिंबा आहे, मात्र ते ओबीसी प्रवर्गातून देऊ नये,” असे त्यांनी सांगितले. ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशेहून अधिक जातींचा समावेश आहे, ज्यांना अद्यापही पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही.…
सात हजारांची लाच भोवली; धुळे महापालिकेतील लाचखोर मुकरदम एसीबीच्या जाळ्यात…. सफाई कर्मचारीच्या हजेरी मधील नियमितता दाखवण्यासाठी मागितली होती लाच… धुळे महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्याची हजेरी लावून पगार नियमित काढण्यासाठी तडजोडी अंती सात हजारांची लाच स्वीकारताना धुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील मुकरदमाला धुळे एसीबीने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. रवींद्र शामराव धुमाळ (50, रा.भटाई माता रिक्षा स्टॉप, मोहाडी उपनगर, ता.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या कारवाईने धुळे मनपात आज लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे… तक्रारदार हे धुळे महापालिकेतील आरोग्य विभागात प्रभाग क्रमांक 14 मध्ये सफाई कर्मचारी आहेत. सफाई कर्मचाऱ्यांवर देखरेख करण्यासाठी मुकरदम म्हणून संशयित आरोपी रवींद्र धुमाळ यांची नियुक्ती केलेली…
धुळे हादरले! माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी घटना धुळे, प्रतिनिधी: धुळे शहराला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना स्नेहनगर भागात घडली आहे. धुळे महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज सोनल शिंदे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाढदिवसानंतर अवघ्या दोन दिवसांत दुर्दैवी अंत विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच विराजचा वाढदिवस मोठ्या उत्साहात कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत साजरा करण्यात आला होता. या आनंदोत्सव साजरा झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच विराजने अशा प्रकारे आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत…
“कांद्याला दर नाही” – नगावच्या शेतकऱ्याने २५ क्विंटल कांदा सडल्याने उखीरड्यावर फेकला धुळे जिल्ह्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांना कांद्याच्या भावाभावामुळे मोठा फटका बसला आहे. मागील वर्षी ३ हजार रुपये क्विंटल दराने विकला गेलेला कांदा यंदा केवळ ५०० रुपयांवर घसरला आहे. एवढा खर्च करूनही उत्पन्न न मिळाल्याने त्यांच्या चाळीत साठवलेला तब्बल २५ क्विंटल कांदा सडून गेला. अखेर निराश होऊन त्यांनी तो कांदा उखीरड्यावर फेकावा लागला. ही व्यथा फक्त एका शेतकऱ्याची नसून संपूर्ण परिसरातील शेतकरी दरकपातीमुळे हवालदिल झाले आहेत. “सरकारकडून फक्त आश्वासने मिळतात, प्रत्यक्षात मदत मात्र नाही,” असे म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रतिनिधी – नागिंद मोरे
साक्री तालुक्यातील आश्रम शाळेत आजाराचा कहर; ६१ विद्यार्थी आजारी, १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील निवासी आश्रम शाळेत तब्बल ६१ विद्यार्थी अचानक थंडी, ताप, खोकला व सर्दीच्या आजाराने ग्रस्त झाले. या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोनाली सुनील पावरा (वय १२, रा. खरवड, ता. धडगाव, जि. नंदुरबार) या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांना उपचारानंतर पालकांच्या ताब्यात सोपविण्यात आले असून काहींना पुन्हा आश्रमशाळेत दाखल करण्यात आले आहे. शाळा प्रशासनाच्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना तब्येतीची तक्रार होती. त्यानंतर मुख्याध्यापक…

